'जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 12:44 PM2019-01-16T12:44:14+5:302019-01-16T12:59:50+5:30
जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी हे भूमिपुत्र असल्याचं सांगत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी हे भूमिपुत्र असल्याचं सांगत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसेच काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्राने पुढाकार घेत दहशतवाद्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनी अनंतनाग येथे ‘सध्या पाकिस्तान आणि फुटीरतावाद्यांशी चर्चा होणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दहशतवाद्यांचं नेतृत्व करणाऱ्यांशीही चर्चा केली पाहिजे कारण त्यांच्याकडे शस्त्र आहेत आणि तेच ही शस्त्र संस्कृती संपवू शकतात’ असं म्हटलं आहे. तसेच ‘मला वाटतं एका ठराविक वेळेनंतर हुरियत कॉन्फरन्स आणि दहशतवाद्यांशी चर्चा झालीच पाहिजे’, असं ही म्हटलं आहे.
PDP Chief and former J&K CM Mehbooba Mufti: I've always said that the local militant is the son of the soil. Our attempts should be to save him. I believe, in Jammu and Kashmir, not only Hurriyat but those with the guns should also be engaged with, but not at this time. pic.twitter.com/zMcMGp3jda
— ANI (@ANI) January 15, 2019
'आपल्याला यश मिळेल हा विचार करून 2014 च्या निवडणुकांआधी काँग्रेसने अफजल गुरुला फाशी दिली होती. आज भाजपा ही त्याची पुनरावृत्ती करत याहे. त्यांनी कन्हैया, उमर खालिद आणि जम्मू-काश्मीरच्या सात-आठ विद्यार्थ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे' असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.
Mehbooba Mufti: Jo ki (chargesheet in JNU sedition case) bilkul ghalat hai. Aisa mehsoos ho raha hai ki 2019 ke elections ki tayari mein J&K ke logon ko phir se mohra banaya jaa raha hai. unko istemaal kiya ja raha hai. Vote ki rajniti ho rahi hai https://t.co/c5neNJ2HXM
— ANI (@ANI) January 15, 2019
Former J&K CM Mehbooba Mufti: We shook hands with BJP as they had the mandate, to have talks on Jammu & Kashmir issue just like Vajpayee Ji held talks with Hurriyat & Pakistan. But Modi Ji couldn't walk on the path of Vajpayee Ji even though he had the mandate pic.twitter.com/5jZsg42LxG
— ANI (@ANI) January 15, 2019