"भाजपाचे तीन मुख्यमंत्री असे आहेत जे कदाचित मोदी-शाह यांचा झेंडा स्वीकारणार नाहीत?"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 05:47 PM2021-09-13T17:47:50+5:302021-09-13T18:05:00+5:30
EX IAS Surya Pratap Singh taunt on Modi government and BJP : भाजपावर जोरदार निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत भाष्य केलं आहे.
नवी दिल्ली - सेवानिवृत्त आयएएस अधिकारी सूर्य प्रतापसिंह (Surya Pratap Singh) हे सोशल मीडियावर आपल्या विधानांसाठी खूपच लोकप्रिय आहेत. त्यांनी आता थेट भाजपा आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपावर जोरदार निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याबाबत भाष्य केलं आहे. "आता उत्तर प्रदेशमध्ये 'खेला होबे' नक्की" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "वरवर दिसणाऱ्या शांततेदरम्यान येणारे काही आवाज हे नक्कीच काहीतरी संकेत देत आहेत" असं देखील म्हटलं आहे. सूर्य प्रतापसिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
सूर्यप्रताप सिंह यांनी "भाजपाचे तीन मुख्यमंत्री असे आहेत जे कदाचित मोदी-शाह यांचा झेंडा स्वीकारणार नाहीत? टोकाच्या या लढाईत ही सर्वशक्तिमान जोडीची ताकद कमी होते आहे का? वरवर दिसणाऱ्या शांततेदरम्यान येणारे काही आवाज हे नक्कीच काहीतरी संकेत देत आहेत. आता काहीही झालं तरी, आता उत्तर प्रदेशातही खेला होबे नक्की" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसचे आमदार मुकेश शर्मा यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे. "भाजपाचा खेळ अयशस्वी ठरला आहे. मुख्यमंत्री बदलणं हा प्रयोग नसून अपयश लपवण्याचा खेळ आहे" असं म्हटलं आहे. याच दरम्यान, सूर्यप्रताप सिंह यांची पोस्ट पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
भाजपा के तीन CMs ऐसे हैं,जिन्हें मोदी-शाह का परचम शायद स्वीकार नहीं?
— Surya Pratap Singh IAS Rtd. (@suryapsingh_IAS) September 11, 2021
शिखर की इस लड़ाई में सर्वशक्तिमान जोड़ी के वर्चस्व का दायरा सिकुड़ रहा है?
बाहर से दिखते सन्नाटे के बीच आती जाती आवाजें कुछ संकेत अवश्य छोड़ रही हैं।
चाहे कुछ भी हो,यूपी में तो #खेला_होबे।
"मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचं अपयश झाकलं जाणार नाही, CM नाही तर PM बदला"
काँग्रेसने (Congress) ट्विटरवर #CM_नहीं_PM_बदलो ही मोहीम सुरू केली असून मोदी सरकार आणि भाजपावर (BJP) निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचं अपयश झाकलं जाणार नाही, CM नाही तर PM बदला" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काँग्रेसने याबाबत काही ट्विट्स केली आहेत. "भाजपा सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपाने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलं. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश काही झाकले जाणार नाही" असं म्हणत काँग्रेसने टीकास्त्र सोडलं आहे. "श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र" असल्याचं देखील अन्य एका ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटलं आहे.
"मोदी सरकार अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार?"
देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणावरून देखील काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. "आपल्या लोकांचं आधी लसीकरण करुन घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करणे हा सर्वात खात्रीशीर उपाय आहे. मोदी सरकारला ही साधी गोष्ट का कळली नाही? मोदी सरकार आपलं अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार?" असं काँग्रेसने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच या ट्विटमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांमध्ये भारत इतर प्रगत देशांपेक्षा फार मागे असल्याचं आकडेवारीतून दाखवण्यात आलं आहे. याआधी देखील काँग्रेसने विविध मुद्द्यांवरून मोदींवर निशाणा साधला आहे.
"भाजपा सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली, संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलं"; काँग्रेसचा हल्लाबोल #Congress#BJP#ModiGovt#Politics#gujaratpoliticshttps://t.co/RSkdA3uBdypic.twitter.com/NJWEon8nME
— Lokmat (@MiLOKMAT) September 12, 2021