माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ

By admin | Published: March 1, 2016 01:12 AM2016-03-01T01:12:30+5:302016-03-01T01:12:30+5:30

महापौर प्रवीण दटके यांची घोषणा : नागपूर महोत्सवात १९६५ युद्धातील वीर सैनिकांचा सत्कार

Ex-servicemen forgive property taxes | माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ

माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ

Next
ापौर प्रवीण दटके यांची घोषणा : नागपूर महोत्सवात १९६५ युद्धातील वीर सैनिकांचा सत्कार
नागपूर : नागपूर महापालिकेच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी नागपूर महोत्सवात केली. महोत्सवात १९६५च्या भारत-पाक युद्धातील वीर सैनिकांचा सन्मान महापालिकेतर्फे करण्यात आला.
माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट मिळावी यासाठी माजी सैनिकांच्या संघटनेने नागपूर महापालिकेकडे मागणी केली होती. या आधारावर महापालिकेने सभागृहात ठराव पारित करून शासनाकडे पाठविला. यासंदर्भात राज्य सरकारने महापालिकेला पत्र पाठवून, यासंदर्भात महापालिकास्तरावर निर्णय घ्यावा,असा अभिप्राय दिला. त्यामुळे वीर सैनिकांच्या सत्काराप्रसंगी माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा महापौरांनी केली. या निर्णयामुळे शहरातील हजारो माजी सैनिकांना लाभ मिळणार आहे. सत्कार सोहळ्याला माजी खासदार दत्ता मेघे, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, परिवहन समितीचे सभापती बंडू राऊत, अप्पर आयुक्त नयना गुंडे, बाल्या बोरकर, प्रफुल्ल गुडधे, रश्मी फडणवीस, सारिका नांदूरकर, चेतना टांक, कामील अन्सारी, उपायुक्त प्रमोद भुसारी, अग्निशमन विभागप्रमुख राजेंद्र उचके, भाजपाच्या माजी सैनिक आघाडीचे राम कोरके, इंडियन एक्स सर्व्हिसमन मुव्हमेंटचे संयोजक विलास दवणे उपस्थित होते.
- या वीर सैनिकांचा झाला सत्कार
कर्नल देवेंद्र मेधा, कर्नल मनोहर रामचंद्र पिंपळखुटे, ले. कर्नल बसंत हनुमंत सरदेशपांडे, कॅप्टन देवीकांत नारंजे, डॉ. वसंत तत्त्ववादी, कॅप्टन रामभाऊ घोडे, कॅप्टन शामराव भागवत, सुभेदार मेजर रामदास मकेसर, मधुकर खुजे, सुभेदार राजाराम पाठक, बलवंत बाभुळकर, रामराव बेलसरे, नायब सुभेदार दौलतराव वाघमारे, प्रकाश खरे, मनोहर गव्हाळे, लीलाधर हनवते, रामदास नायडू, सुधाकर मोरे, मंजित सिंह, शिवाजी मोहिते, नायक विजय गोविंद तट्टे, विष्णू पाटणकर, बळवंत ढोमणे, मनोहर वड्याळकर, क्रिष्णा जंगलू वाघमारे, रामा शंकर श्रीवास्तव, मन्साराम एम., हरी जांभूळकर, शंकर गावंडे, डॉ. सबीरकुमार मुखर्जी, ईश्वरसिंग बैस, वासुदेव तायवाडे, आत्माराम कांबळे, मोतीराम सुरे, के. राम केझरवानी, मधुसूदन कानडे, पी.टी. राघोर्ते, नरहर निकम, सुनील पद्दलवार, ज्ञानेश्वर मोहोड, नामदेव खंडाळकर, गोरखनाथ चहांदे, प्रभात खडक्कार, सुधाकर तापस, नरहरी अनासाने, उत्तम डकरे, गोपालसिंह कछवा, परमजित अरोरा,

Web Title: Ex-servicemen forgive property taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.