नीट परीक्षेआधी विद्यार्थ्यांनी दिली सेक्युरिटी टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 02:09 AM2018-05-07T02:09:05+5:302018-05-07T02:09:05+5:30
कोणत्याही प्रकारची स्टेशनरी सोबत न्यायची नाही. स्वत:चा पेन नाही. प्लास्टिक पाऊच नाही. कोणते कपडे घालून यायचे याचाही नियम. वॉलेट, गॉगल एवढेच काय पँटला बेल्टही लावून जायचा नाही... या नियमांच्या कसोटीचा सामना करत जवळपास १३ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आज नीट परीक्षेआधी ‘सेक्युरिटी टेस्ट’चा सामना करावा लागला.
कोणत्याही प्रकारची स्टेशनरी सोबत न्यायची नाही. स्वत:चा पेन नाही. प्लास्टिक पाऊच नाही. कोणते कपडे घालून यायचे याचाही नियम. वॉलेट, गॉगल एवढेच काय पँटला बेल्टही लावून जायचा नाही... या नियमांच्या कसोटीचा सामना करत जवळपास १३ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आज नीट परीक्षेआधी ‘सेक्युरिटी टेस्ट’चा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांकडे मोबाइल आहे का? कानात किंवा केसांमागे ब्लू टूथ आहे का? कोणते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सोबत आहे का? अशा प्रकारच्या तपासण्यांचा सामना विद्यार्थ्यांना परीक्षेआधीच करावा लागला.
विद्यार्थ्याच्या वडिलांचा मृत्यू
केरळमध्ये नीट परीक्षेसाठी आलेल्या तामिळनाडूच्या विद्यार्थ्याच्या वडिलांचा परीक्षा केंद्राबाहेर मृत्यू झाला. मुलगा आत पेपर सोडवत असताना बाहेर बसलेल्या वडिलांना हार्ट अटॅक आला. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून मुलाला ३ लाखांची मदत जाहीर केली.