बीएसएफ जवानाची कौतुकास्पद कामगीरी; भारतीय ह्द्दीत चुकून आलेल्या ३ पाक नागरिकांची सुटका
By admin | Published: June 12, 2016 12:27 PM2016-06-12T12:27:03+5:302016-06-12T12:27:03+5:30
भारतीय ह्द्दीत चुकून घुसलेल्या तिघांची बीएसएफने मिठाई देऊन सुटका केली सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नारोवाल जिल्ह्यात ही घटना घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
अमृतसर, दि. १२ : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपुर्ण संबधातही काय सकारात्मक बाबी घडत असतात. यावर आपल्यापैकी अतिशय कमी लोकांचा विश्वास असतो. भारतीय ह्द्दीत चुकून घुसलेल्या तिघांची बीएसएफने मिठाई देऊन सुटका केली सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नारोवाल जिल्ह्यात ही घटना घडली. या घटनेनंतर भारतीय जवानांनी दाखवलेल्या माणुसकीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
मोहम्मद आमिर आणि साने अरशद हे पाकिस्तानातील रिया गावातील युवक असून आंतरराष्ट्रीय सीमेवरुन चुकून भारतीय हद्दीत आले होते. नोमाल अली हा युवक पाकिस्तानातील फैसलाबाद जवळील चक गावचा आहे. सुटका करण्यात आलेले हे युवक भारतीय सैनिकांच्या या वर्तनामुळे आश्चर्यचकित झाले होते.
तिघेही चुकून भारताच्या हद्दीत आले होते. त्यांची व्यवस्थित विचारपूस करण्यात आली. त्यांना भारतीय जवान आणि हा क्षण नेहमीसाठी लक्षात राहण्यासाठी चॉकलेट भेट देण्यात आले, असं बीएसएफ जवान सी. पी. मीना यांनी सांगितलं.
बीएसएफच्या जवानांनी आमची चांगल्या प्रकारे चौकशी केली. आम्हीही त्यांना सहकार्य केलं, असं तिघांपैकी एका पाकिस्तानी व्यक्तिने सांगितलं.