गहू वगळता धान्य तेजीत हरभर्याची आवक जेमतेम : दादरच्या आवकेत वाढ
By admin | Published: March 23, 2016 12:11 AM2016-03-23T00:11:33+5:302016-03-23T00:11:33+5:30
जळगाव- कृषि उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात गहू वगळता हरभरा, दादर (रब्बी ज्वारी), दुरी (ज्वारी), बाजरीचे दर तेजीत आहेत. होळीनंतर हरभर्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज बाजारपेठ विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
Next
ज गाव- कृषि उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात गहू वगळता हरभरा, दादर (रब्बी ज्वारी), दुरी (ज्वारी), बाजरीचे दर तेजीत आहेत. होळीनंतर हरभर्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज बाजारपेठ विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. यंदा गव्हाची अपेक्षित क्षेत्रावर पेरणी झाली नव्हती. ३५ हजार हेक्टरवर पेरणीची अपेक्षा होती, पण फक्त २१ हजार हेक्टरवर जिल्ात पेरणी झाली. अशीच स्थिती दादर, बाजरी व हरभरा या पिकांबाबत आहे. जिल्हाभरात यंदा एक लाख ९० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी अपेक्षित होती, परंतु सर्व रब्बी पिकांची मिळून ९० हजार हेक्टरवर पेरणी झाली. यामुळे रब्बी पिकांचे अपेक्षित उत्पादन आलेले नाही. याचा परिणाम म्हणून की काय हरभरा, बाजरी, दादरचे दर तेजीत आहेत. बाजार समितीमध्ये गहू वगळता इतर धान्याची हवी तशी आवकही सध्या नाही. परंतु होळीनंतर आवकेमध्ये वाढ होईल, अशी शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे. दर्जा उत्तमयंदा गहू, हरभरा, दादर, बाजरीचा दर्जा उत्तम प्रकारचा आहे. यंदा अवकाळी पाऊस झाला नाही. धान्याची कापणी, काढणी व्यवस्थित झाली. यामुळे चार ते पाच वर्षानंतर चांगल्या दर्जाचे धान्य स्थानिक भागातून बाजार समितीमध्ये येत आहे. हरभरा तेजीत, काबलीला सात हजारांवर भावयंदा काबली व इतर प्रकारच्या हरभर्याचे फारसे उत्पादन झालेले नसल्याने त्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यात पुढील आठवड्यात आणखी २०० रुपयांनी वाढ होऊ शकते. काबली हरभर्याला तर सात हजार ३०० रुपये कमाल दर बाजार समितीमध्ये मिळाला. बाजार समितीमधील घाऊक बाजारातील धान्याचे दर व आवक(दर प्रतिक्विंटल व रुपयात, आवक क्विंटलमध्ये)धान्य दर आवकगहू-१५५० ते १७५० २१२दादर-१७५० ते २२७५ १३४ज्वारी-१७७५ ५९बाजरी-१८११ ६५हरभरा-४१०० ते ४४०० १००काबली-७३०० ०८कोट-सध्या गहू वगळता इतर धान्याचे दर तेजीत आहेत. हरभर्याच्या दरात पुढील काळात आणखी वाढ होऊ शकते. हरभर्याची हवी तशी आवक नाही. उत्पादनातील घट त्यामागे कारणीभूत आहे. पण ज्वारी, गहू आदी धान्याची आवक पुढील काळात वाढू शकते. त्यानंतर दर स्थिर होतील. -प्रवीण पगारिया, व्यापारी