2000च्या बदल्यात बँकेनं 'त्या' महिलेला दिली 1 रुपयांची नाणी

By Admin | Published: November 17, 2016 02:57 PM2016-11-17T14:57:26+5:302016-11-17T16:28:16+5:30

2000ची नोट बदलण्यासाठी आलेल्या एका महिलेला चक्क 2000 रुपयांच्या बदल्यात 1 रुपयांची नाणी एका पिशवीत भरून दिली आहेत.

In exchange for 2000, the bank gave the 'woman' 1 rupee coin | 2000च्या बदल्यात बँकेनं 'त्या' महिलेला दिली 1 रुपयांची नाणी

2000च्या बदल्यात बँकेनं 'त्या' महिलेला दिली 1 रुपयांची नाणी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

उत्तर प्रदेश, दि. 17 - गेल्या आठवड्यात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला असला तरी बँकेतील गर्दी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच लांबच्या लांब ग्राहकांच्या रांगा रस्त्यांवर येत आहेत. लोकांचे दिवसातील अनेक तास या रांगेतच जात असून, लोकांना पैसेच मिळत नसल्यानं त्याचे हाल होत आहेत. उत्तर प्रदेशमधल्या एका बँक कर्मचा-यानं तर यावर कढी केली आहे. बँक कॅशियरनं चक्क 2000 रुपयांच्या बदल्यात 1 रुपयांची नाणी एका पिशवीत भरून दिली आहेत.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधल्या मोहनलाल गंज येथील रहिवासी सरजू देवी स्वतःकडे असलेले 2000 रुपये बँकेत बदलून घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी बँक कॅशियरनं त्यांना 2 हजारच्या बदल्यात एका पिशवीत भरून 1 रुपयांची नाणी दिली. त्या नाण्यांनी भरलेल्या पिशवीचं वजन 17 किलो झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

60 वर्षांच्या सरजू देवी एवढी जड बॅग उचलू शकत नसल्यानं अखेर ती बॅग उचलण्यासाठी त्यांनी कॅन्सर या आजारानं पछाडलेल्या स्वतःच्या मुलाला बँकेत बोलावून घेतले. मी एवढ्या वेळ रांगेत उभी राहूनही मला 1 रुपयांच्या नाण्यांनी भरलेली बॅग दिली. नाण्यांनी भरलेली बॅग 17 किलोची असल्यामुळे मी ती उचलून घरी आणू शकत नव्हते, असंही सरजू देवी यांनी हिंदुस्थान टाइम्सला सांगितले आहे. एकंदरीतच बँकेत तासनतास उभं राहूनही लोकांना न्याय मिळत नाही आहे.

Web Title: In exchange for 2000, the bank gave the 'woman' 1 rupee coin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.