मोदी सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ; लिटरमागे ३ रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 09:36 AM2020-03-14T09:36:54+5:302020-03-14T10:06:43+5:30

पेट्रोल, डिझेलच्या किमती ३ रुपयांनी वाढणार

Excise duty on both petrol and diesel increased by Rs 3 per litre | मोदी सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ; लिटरमागे ३ रुपयांची वाढ

मोदी सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ; लिटरमागे ३ रुपयांची वाढ

Next
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय तेल बाजारात पेट्रोल, डिझेल स्वस्तमोदी सरकारकडून इंधनावरील उत्पादन शुल्कात वाढउत्पादन शुल्कात वाढ करून सरकार कमावणार महसूल

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढणार आहेत. पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क ३ रुपयांनी वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. इंधनाचे दर वाढणार असल्यानं वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. 




सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झालेत. मात्र तरीही सरकारनं उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेलसाठी प्रति लीटरमागे तीन रुपये जास्त मोजावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर सातत्यानं कमी होत आहेत. 

पेट्रोल, डिझेलच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं घसरण सुरू असताना मोदी सरकारनं इंधनावरील उत्पादन शुल्क ३ रुपयांनी वाढवलं आहे. यामुळे सरकारला सामान्य जनतेचा रोष सहन करावा लागू शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकार पेट्रोल, डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची वाढ करण्याची शक्यता धूसर असल्याचं क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगितलं. त्याऐवजी येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होऊनही सरकार इंधनाचे दर घटवणार नाही. अशा प्रकारे सरकार उत्पादन शुल्कातील ३ रुपयांची वाढ लागू करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एक ते दीड वर्षांपूर्वी  आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन स्वस्त होत असताना हाच मार्ग वापरुन महसूल मिळवला होता.

गेल्या सव्वादोन महिन्यांत पेट्रोल ५ रुपयांनी कमी झाले आहे. २७ फेब्रुवारीपासून ही घट सुरू आहे. जरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ३० टकक्यांनी कमी झालेले असले तरीही भारतात हे दर एवढ्यात कमी होण्याची शक्यता नाही. कारण पेट्रोल डिझेलचे दर दररोज ठरवताना एक नियम केलेला आहे. यामध्ये ऑईल कंपन्या १५ दिवसांचा बेंचमार्क रेटचा ताळमेळ ठेवत दर ठरवतात. यामुळे हे दर कच्चे तेल आणि डॉलरची किंमत यावरील चढ-उतारावर अवलंबून असते. 
 

Web Title: Excise duty on both petrol and diesel increased by Rs 3 per litre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.