पंढरीत एक्साईजची दारूबंदी मोहीम मिशन आषाढी : ३५० हातभी दारू जप्त
By admin | Published: June 18, 2015 01:39 PM2015-06-18T13:39:08+5:302015-06-18T13:44:27+5:30
सोलापूर :
सोलापूर :
पुढील महिन्यात होणार्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदी मोहीम हाती घेतली असून, मंगळवारी पिलीव (ता. माळशिरस) येथे ३५० लिटर हातभी दारू जप्त केली.
अधीक्षक सागर धोमकर, उपअधीक्षक रविकिरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनासाठी दुय्यम निरीक्षक वाय. एस. व्हनमारे यांनी आणि त्यांची टीम दारुबंदी मोहिमेसाठी सरसावली आहे. पिलीव येथून एका मारुती ओमिनीमधून ३५० लिटर दारू इसबावीकडे येत असल्याची कुणकुण व्हनमारे यांना लागली. त्यानुसार त्यांनी इसबावी परिसरात सापळा रचला. एमएच-१२/डीवाय-३५०५ ही गाडी अडवून आतील दारू आणि इतर साहित्य असा ३ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुय्यम निरीक्षक वाय. एस. व्हनमारे यांच्या नेतृत्वाखाली एस. एस. पाटील, आर. डी. जगताप, ए. एल. गायकवाड यांनी ही कामगिरी केली. गुन्ातील आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे. तपास व्हनमारे करीत आहेत. (प्रतिनिधी)
फोटो ओळी
इसबावी (ता. पंढरपूर) परिसरात हातभीची दारू जप्त केल्यानंतर घेतलेल्या छायाचित्रात दुय्यम निरीक्षक वाय. एस. व्हनमारे, एस. एस. पाटील, ए. एल. गायकवाड आदी.