पेट्रोल, डिङोलवरील अबकारी करात वाढ

By Admin | Published: November 13, 2014 11:35 PM2014-11-13T23:35:45+5:302014-11-13T23:35:45+5:30

पेट्रोल आणि डिङोलवरील अबकारी करात केंद्र सरकारने गुरुवारी लिटरमागे 1.5क् रुपयांची वाढ केली आहे.

Excise tax increases on petrol, diesel | पेट्रोल, डिङोलवरील अबकारी करात वाढ

पेट्रोल, डिङोलवरील अबकारी करात वाढ

googlenewsNext
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिङोलवरील अबकारी करात केंद्र सरकारने गुरुवारी लिटरमागे 1.5क् रुपयांची वाढ केली आहे. तथापि, ही करवाढ ग्राहकांना सोसावी लागणार नाही, कारण तेल कंपन्या या आठवडय़ात कमी होणा:या पेट्रोल-डिङोलच्या किरकोळ दरांत ती समाविष्ट करणार आहेत. 
अबकारी कर वाढीमुळे सरकारला अर्थसंकल्पातील तूट भरून काढण्यासाठी जवळपास 13 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे तेल कंपन्या किरकोळ विक्रीची किंमत लिटरमागे 1 रुपया कमी करतील. या निर्णयाची अंमलबजावणीही 16 नोव्हेंबरपासून होईल.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या ऑगस्टपासून सलग सहा वेळा पेट्रोलच्या आणि गेल्या महिन्यात डिङोलच्या किमतीत दोन वेळा घट झाली. अबकारी कर सर्वसाधारण आणि अनब्रँडेड पेट्रोलसाठी  लिटरमागे 1.2क् रुपयांवरून 2.7क् रुपये, तर अनब्रँडेड डिङोलच्या दरात 1.46 रुपयांवरून 2.96 अशी वाढ करण्यात आल्याचे सरकारी अधिसूचनेत म्हटले. बँड्रेड पेट्रोलची किंमत 2.35 वरून 3.85 रुपये लिटर, तर ब्रँडेड डिङोलची किंमत लिटरमागे 3.75 वरून 5.25 रुपये करण्यात आली आहे. ही वाढ आम्ही ग्राहकावर टाकणार नाही, असे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बी. अशोक यांनी सांगितले. या महिन्याच्या शेवटी दरांचा आढावा घेतला जाईल व परिस्थितीनुसार दर ठरतील, असेही अशोक म्हणाले.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम या महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ाचा इंधनाच्या दराचा आढावा घेऊन शनिवारी पेट्रोल आणि डिङोलच्या दराचा निर्णय घेतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील हालचाली बघता इंधनाचे दर कमी होतील. 1 नोव्हेंबर रोजी पेट्रोल लिटरमागे 2.41 रुपयांनी, तर डिङोल 2.25 रुपयांनी स्वस्त झाले होते. गेल्या ऑगस्टपासून पेट्रोल 9.36 रुपयांनी स्वस्त झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4सरकारने डिङोलच्या किमतीवरील नियंत्रणो काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाच वर्षानंतर डिङोलच्या किमतीत प्रथमच म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी 3.37 रुपयांनी घट झाली होती. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी डिङोल पुन्हा स्वस्त होऊन ते आज 53.35 रुपये लिटर आहे.
 
4याआधी जानेवारी 2क्क्9 मध्ये डिङोल स्वस्त झाले होते. सरकारने पेट्रोलवरील नियंत्रणो 2क्1क् मध्ये काढून घेतल्यानंतर तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला आढावा घेतात. 
4आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची सरासरी किंमत आणि रुपया-डॉलरचा विनिमय दर विचारात घेऊन हा आढावा घेतला जातो. 

 

Web Title: Excise tax increases on petrol, diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.