चंडीगडमध्ये गॅस लीकमुळे खळबळ, खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची पळापळ, १६०० मुलं सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 12:50 PM2023-11-22T12:50:37+5:302023-11-22T12:54:04+5:30
Gas Leak in Chandigarh: पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंडीगड येथे मंगळवारी एका खासगी शाळेजवळ पाइपलाइनमधून गॅस गळती झाली. गॅस गळती झाल्यानंतर घटनास्थळाजवळच असलेल्या खासगी शाळेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंडीगड येथे मंगळवारी एका खासगी शाळेजवळ पाइपलाइनमधून गॅस गळती झाली. गॅस गळती झाल्यानंतर घटनास्थळाजवळच असलेल्या खासगी शाळेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळेत उपस्थित असलेले विद्यार्थी वर्गातून बाहेर पळाले. तसेच शिक्षकांनीही खबरदारी म्हणून मुलांना घरी पाठवले.
मिळालेल्या माहितीनुसार चंडीगडच्या सेक्टर ४०मध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळा उघडली होती. शाळेला लागून असलेल्या भिंतीच्या बाजूने जमिनीतून एक पाईपलाईन गेलेली आहे. येथे जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम सुरू होते. तेवढ्यात इथे गॅस गळती सुरू झाली.
या घटनेची माहिती मिळताच शाळेमध्ये गोंधळ सुरू झाला. तसेच अग्निशमन विभाग आणि पोलिसांनाही माहिती दिली गेली. शाळेतून १६०० मुलांना बाहेर काढून घरी पाठवण्यात आले.
या दरम्यान, घाबरलेली अनेक मुले बॅगसुद्धा सोडून पळून गेली. लहान वर्गातील मुलांना लवकर बाहेर काढण्यात आले. शाळेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, बाहेर कुठलं तरी काम सुरू होतं. त्यानंतर ही संपूर्ण घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे.