गुुरूपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात
By admin | Published: July 19, 2016 11:42 PM2016-07-19T23:42:19+5:302016-07-19T23:42:19+5:30
जळगाव : गुरूपौर्णिमेनिमित्त विविध संस्था, विद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एकलव्य, अर्जुन यांच्या आयुष्यातील गुरूंचे स्थान व त्यांचे महान कार्य याची माहिती मान्यवरांनी विविध कार्यक्रमांमध्ये दिली.
Next
ज गाव : गुरूपौर्णिमेनिमित्त विविध संस्था, विद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एकलव्य, अर्जुन यांच्या आयुष्यातील गुरूंचे स्थान व त्यांचे महान कार्य याची माहिती मान्यवरांनी विविध कार्यक्रमांमध्ये दिली. विवेकानंद प्रतिष्ठानया संस्थेत सुधाकर माळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. योगिता शिंपी, मुख्याध्यापक हेमराज पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी विविध कथा सांगितल्या. माळी यांनी मार्गदर्शन केले. सविता कुलकर्णी यांनी गोष्ट सांगितली. लिना जोशी, स्मिता पाटील, कामिनी जावळे, रिना भोईटे, भाग्यश्री वाणी, अर्चना पाटील यांनी सहकार्य केले. मंजुषा साळुंखे यांनी प्रार्थना म्हटली. संस्कार भारतीया संस्थेतर्फे २० रोजी सायंकाळी ७ वाजता व.वा.वाचनालयाच्या सभागृहात डॉ.एस.एस.राणे, हेमंत बेलसरे, भाजी पुरवठादार कोकीळाताई यांचा सत्कार होणार आहे. कोल्हे विद्यालयका.ऊ.कोल्हे विद्यालयात मुख्याध्यापिका जे.आर.गोसावी, ए.व्ही.ठोसर, बी.डी.अत्तरदे, एच.जी.काळे, एस.डी.खडके यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. जे.एस.राणे यांनी सूत्रसंचालन केले. ए.सी.तडवी, जी.बी.पवार यांनी आभार मानले. प्रगती शाळाप्रगती माध्यमिक शाळेत शोभा फेगडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. ज्योती कुलकर्णी, मनीषा पाटील उपस्थित होत्या. २४ गायत्री मंत्रांचे पठण करण्यात आले. हर्षा पाटील यांनी भजन सादर केले. सचिन दुनाखे यांनी शुभेच्छा दिल्या. दीपक बारी यांनी सूत्रसंचालन कले. झिपरूअण्णा विद्यालयया विद्यालयात सुरेखा येवले, मोतीलाल येवले, नेमचंद येवले, हेमांगी येवले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. विविध भक्तीगीतांचे गायन शिक्षकांनी केले. शुभम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन काजल राजपूत यांनी केले. नवीन विद्यालयप्रगती मंडळाच्या नवीन विद्यालयात मुख्याध्यापिका शालिनी भंगाळे, डॉ.रवींद्र माळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी संगीता निकम, नीलेश नाईक आदींनी सहकार्य केले. बीयूएन रायसोनी स्कूलया स्कूलमध्ये वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा झाली. जयदेव मोरे, अथर्व रनधीर, निधी भवर, पलन मालपानी, राशी जैन, नेत्रा जंगले, दिव्या गौर, राज सावंत, मयूर इंगळेे, नंदिता पुराणिक, रोशनी चौबे यांनी यश मिळविले. नलिनी शर्मा अध्यक्षस्थानी होत्या. विठ्ठल पाटील यांनी संयोजन केले.