लाल किल्ल्यात स्फोटके आढळल्याने खळबळ
By admin | Published: February 6, 2017 01:42 PM2017-02-06T13:42:32+5:302017-02-06T16:29:48+5:30
तिहासिक आणि राजकीय महत्त्व असलेल्या लालकिल्यात स्फोटकांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व असलेल्या लालकिल्यात स्फोटकांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली आहे. किल्याच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात रायफल्सची काडतुसे आणि काही हँड ग्रेनेड आढळली असून, या स्फोटकांची मुदत संपलेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एके काळी या लाल किल्ल्यामध्ये लष्कर राहत असे. त्यावेळी नजरचुकीने ही स्फोटके येथेच राहिली असावीत, असा अंदाज प्राथमिक तपासानंतर व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरातत्व विभागाकडून लालकिल्ल्यामध्ये साफसफाईचे काम सुरू होते. त्यावेळी एका अडगळीच्या कोपऱ्यात ही काडतुसे आणि स्फोटके आढळली. त्या ठिकाणी ही स्फोटके लपवून ठेवण्यात आली असावीत, असा अंदाज आहे. मात्र लाल किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर स्फोटके पाहून पोलिसांना धक्का बसला आहे. दरम्यान, एनएसजीचे बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्याच्यासोबत एनएसजी आणि लष्कराचे अधिकारीही या प्रकाराचा तपास करत आहेत.
17 वर्षांपूर्वी 22 डिसेंबर 2000 रोजी लाल किल्ल्यावर लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी हल्ला करून एके-47 मधून गोळीबार केला होता. ज्याता तीन जवान हुतात्मा झाले होते. तेव्हापासून सातत्याने लाल किल्ल्यावर हल्ला करण्याच्या धमक्या वारंवार मिळत असतात. त्यामुळे या परिसराच चोख सुरक्षा व्यवस्था ठेवलेली असते.
#UPDATE During cleaning of wells inside Red Fort y'day sme ammunution&explosive boxes were discovered. Police cordoned off area&informed NSG
— ANI (@ANI_news) February 6, 2017