पाठ्यपुस्तकातून डुक्कर, डुकराचे मांस असे संदर्भ वगळा - ऑक्स्फर्ड
By admin | Published: January 15, 2015 11:44 AM2015-01-15T11:44:49+5:302015-01-15T11:57:25+5:30
मुसलमान आणि ज्यू समाजाचा विरोध टाळण्यासाठी ऑक्स्फर्ड विद्यापीठ प्रेसने सर्व पाठ्यपुस्तक लेखकांना पुस्तकातून डुक्कर, डुकराचे मांस यासंबंधीचे संदर्भ वगळण्याची सूचना केल्याचे वृत्त आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - मुसलमान आणि ज्यू समाजाचा विरोध टाळण्यासाठी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने सर्व पाठ्यपुस्तक लेखकांना पुस्तकातून डुक्कर, डुकराचे मांस यासंबंधीचे संदर्भ वगळण्याची सूचना केल्याचे वृत्त आहे. ऑक्स्फर्ड विद्यापीठ प्रेसच्या अधिका-यांनी याविषयी प्रतिक्रिया दिलेली नाही.
एका खासगी रेडिओ चॅनलवर रेडिओ जॉकीने ऑक्स्फर्ड विद्यापीठ प्रेसने एक पत्रक काढल्याचा दावा त्याच्या रेडिओ शोमध्ये केला आहे. रेडिओ जॉकीची पत्नी ही स्वतः एक लेखिका असून त्या ऑक्स्फर्ड विद्यापीठ प्रेसच्या प्रशासनासोबत पाठपुस्तक तयार करण्यासाठी चर्चा करत आहे. यादरम्यान युनिव्हर्सिटी प्रेसने त्यांच्या पत्नीला हे पत्रक दिल्याचे रेडिओ जॉकीचे म्हणणे आहे. या पत्रकात डुक्कर, डुकराचे मांस किंवा त्यासंबंधीची कोणतीही वस्तूंचा उल्लेख पाठपुस्तकात करु नका व त्याचे संदर्भ दिले असल्यास तेदेखील वगळा अशी सूचना सर्व पाठ्यपुस्तक लेखकांना देण्यात आली आहे.
सर्वोत्तम शिक्षण हे आमचे ध्येय असून यासाठी भेदभाव न करता आम्ही काम करतो. आमची पुस्तक २०० देशांमध्ये विकली जातात. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या ध्येयाशी तडजोड करत नाही. सांस्कृतिक विविधता आणि भावनांचा आदर करत लिखाण करावे यासाठी आम्ही नेहमीच लेखकांना प्रोत्साहन देतो असे युनिव्हर्सिटी प्रेसमधील एका अधिका-याने सांगितले. ब्रिटनमधील खासदारांनी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या या सूचनेवर नाराजी व्यक्त केली आहे.