Exclusive : तेजबहादूरच्या पत्नीने सांगितले पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात लढण्याचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 04:31 PM2019-04-29T16:31:28+5:302019-04-29T16:32:25+5:30
सैन्यातील जेवनामध्ये भ्रष्टाचारावर आवाज उठविला होता. यामुळे त्यांना सैन्यातून काढून टाकण्यात आले.
वाराणसी : उत्तर प्रदेशमधीलवाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले आहेत. त्यांच्याविरोधात बीएसएफमधील भ्रष्टाचारावर आवाज उठविल्याने बडतर्फ झालेले जवान तेजबहाद्दूर यांनी शड्डू ठोकले आहेत. आज सपा-बसपाने उमेदवार मागे घेत तेजबहाद्दूरला पाठिंबा दिला आहे. तेजबहाद्दूर हे मोदी यांच्याविरोधात का लढत आहेत याचे कारण त्यांच्या पत्नीने लोकमतला सांगितले आहे.
सपा-बसपा आणि रालोद यांच्या महाआघाडीने आज अचानक त्यांची उमेदवार शालिनी यादव यांचे तिकिट रद्द केले. तसेच तेजबहाद्दूर यांना महाआघाडीचा उमेदवार घोषित केले आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिव स आहे. दरम्यान, आज तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले आहे. या मतदारसंघात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी, अजय राय आणि तेज बहादूर असा तिरंगी मुकाबला होणार आहे.
मुलाचा मृत्यू कशामुळे?
हरयाणाचे रहिवासी असलेले तेज बहादूर यांनी वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला ते अपक्ष निवडणूक लढवत होते. त्यांच्या या निर्णयाबाबत लोकमतच्या प्रतिनिधीने त्यांची पत्नी शर्मिला यांनी सांगितले की, पुलवामा हल्ला झाल्यानंतर तेजबहाद्दूर व्यथित झाले होते. त्यांनतर त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सैन्यातील जेवनामध्ये भ्रष्टाचारावर आवाज उठविला होता. यामुळे त्यांना सैन्यातून काढून टाकण्यात आले. याकाळात 19 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आम्ही दोघेही घरामध्ये नसताना ही घटना घडली आणि हे लोक मुलाच्या मृत्यूला दुर्घटना झाल्याचे सांगत आहेत.
11 एप्रिलला पोहोचले वाराणसीला
तेजबहाद्दूर हे 18 दिवस आधीच वाराणसीला गेले होते. मी देखील एक दिवस प्रचार केला. मात्र, तब्येत खराब झाल्याने रेवाडीला परतले. सपाने त्यांना उमेदवार बनविल्याने आनंद झाला आहे, असे शर्मिला यांनी सांगितले.