गव्हर्नर तासिर यांच्या मारेकऱ्यास फाशी

By admin | Published: March 1, 2016 03:11 AM2016-03-01T03:11:42+5:302016-03-01T03:11:42+5:30

पंजाबचे उदारमतवादी राज्यपाल सलमान तासिर (६६) यांच्या हत्येबद्दल माजी पोलीस कमांडो मुमताज कादरी याला पाकिस्तान सरकारने सोमवारी फाशी दिली

The execution of the governor Tathar's executioner | गव्हर्नर तासिर यांच्या मारेकऱ्यास फाशी

गव्हर्नर तासिर यांच्या मारेकऱ्यास फाशी

Next

इस्लामाबाद : पंजाबचे उदारमतवादी राज्यपाल सलमान तासिर (६६) यांच्या हत्येबद्दल माजी पोलीस कमांडो मुमताज कादरी याला पाकिस्तान सरकारने सोमवारी फाशी दिली. सलमान तासिर यांनी देशात वादग्रस्त ठरलेल्या ईश्वर निंदेच्या कायद्यात सुधारणा व्हावी अशी भूमिका घेतली होती.
कादरीला फाशी दिल्यामुळे देशात इस्लामवाद्यांनी देशव्यापी निषेध केला असून आजचा दिवस ‘काळा’ असल्याचे म्हटले.
ईश्वर निंदेच्या कायद्यावर तासिर यांनी टीका केल्याबद्दल मुमताज कादरी याने २०११ मध्ये इस्लामाबादेत भरदिवसा बाजारात त्यांच्यावर २८ गोळ्या झाडल्या होत्या. कादरीला रावळपिंडीतील अदिअलिया तुरुंगात पहाटे साडेचारच्या सुमारास फासावर लटकवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: The execution of the governor Tathar's executioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.