राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची फाशी टळली
By admin | Published: July 30, 2015 04:35 AM2015-07-30T04:35:56+5:302015-07-30T04:35:56+5:30
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणारी केंद्र सरकारची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.
Next
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणारी केंद्र सरकारची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. ही याचिका फेटाळल्यामुळे आता राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची फाशी टळली असून, त्यांची जन्मठेपच कायम राहील.
सर्वोच्च न्यायालयाने १८ फेब्रुवारी २०१४ रोजी राजीव गांधी हत्याकांडात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या संथन, मुरुगन आणि पेरारीवलन या तीन आरोपींची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती.