फुटीरवाद्यांच्या घरी छापेमारी, सापडले लष्कर, हिजबुलचे लेटरहेड
By admin | Published: June 3, 2017 04:03 PM2017-06-03T16:03:14+5:302017-06-03T16:03:38+5:30
लष्कर-ए-तोयबा आणि हिजबूल मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांचे लेटरहेड तसंच पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉप सापडले आहेत
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली / श्रीनगर, दि. 3 - काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याच्या हेतूने होणा-या दहशतवादी फंडिंग प्रकरणाचा तपास करणा-या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शनिवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. दिल्ली, हरियाणा आणि काश्मीरमधील वेगवेगळ्या 23 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार या छापेमारीत लष्कर-ए-तोयबा आणि हिजबूल मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांचे लेटरहेड तसंच पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉप सापडले आहेत.
एनआयएने छापेमारीदरम्यान माहिती मिळालेल्या ठिकाणांवरही धाडी टाकल्या आहेत. ज्यांच्यावर छापेमारी करण्यात आली त्यांच्यामध्ये कट्टर फुटीरवादी नेता सैय्यद अली शाह गिलानी यांचा जावई फंटूश, व्यापारी जहूर वाटाली आणि आवामी अॅक्शन पार्टीचे नेता शाहिद-उल-इस्लाम यांच्याशिवाय इतर फुटीरवादी नेत्यांचा समावेश आहे.
Letterheads of LeT and HM, pen-drives, laptops have also been seized. Fresh locations revealed during the questioning to also be searched.
— ANI (@ANI_news) June 3, 2017
काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत एकूण 1.5 कोटी रुपयांची रोख रक्कम तसंच काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. कागदपत्रांची तपासणी सध्या सुरु आहे. काश्मीर खो-यात 1990मध्ये दहशतवादाने तोंड वर काढण्यास सुरुवात केल्यानंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने दहशतवादी फंडिंगसंबंधी छापेमारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Delhi: NIA raids underway at premises of dry fruit merchant Manav Arora, in Greater Kailash Part II area pic.twitter.com/CXRqP2OFj3
— ANI (@ANI_news) June 3, 2017
या पैशांचा वापर खो-यात दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप आहे, याआधी 2002 रोजी आयकर विभागाने गिलानी यांच्यासहित इतर फुटीरवादी नेत्यांची चौकशी केली होती. यावेळी काही कागदपत्रंही जप्त करण्यात आली होती. त्यावेळी कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. एनआयएने 29 मे रोजी तहरीक-ए-हुर्रियतचे फारुख अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, नईम खान आणि जावेद अहमद बाबा उर्फ गाजी यांची चौकशी केली होती.