व्यायामाने श्वसनसंस्थेला आणा बळकटी, समजून घ्या ‘कोरोना’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 11:48 PM2020-04-17T23:48:09+5:302020-04-17T23:48:24+5:30

या पद्धतीत श्वास आत घेताना पोट फुगले पाहिजे ( छाती नाही ) आणि श्वास बाहेर सोडताना पोट आत गेले पाहिजे.

Exercise Strengthen the Respiratory System, Understand 'Corona' | व्यायामाने श्वसनसंस्थेला आणा बळकटी, समजून घ्या ‘कोरोना’

व्यायामाने श्वसनसंस्थेला आणा बळकटी, समजून घ्या ‘कोरोना’

Next

दमा, श्वसनाचे आजार, अ‍ॅलर्जी असे आजार असणारे जरा ही श्वास वाढला किंवा नाक चोंदले तरी कोरोनाच्या भीतीने घाबरून जातात. अनेकांना भीती मुळे अस्वस्थ वाटते, झोप येत नाही. श्वास घेण्याच्या व्यायामामुळे कोरोना टळेल असा दावा करता येणार नाही. श्वसनाच्या व्यायामामुळे फुफ्फुसांना नेहमीपेक्षा अधिक मात्रेत आॅक्सिजन मिळेल. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोनाचा धोका नक्कीच कमी होईल. तसेच दमा, अ‍ॅलर्जी सारख्या आजारांमध्ये फुफुसांची क्षमता वाढवण्यास मदत होईल. ही पद्धत पुढील प्रमाणे आहे.

या पद्धतीत श्वास आत घेताना पोट फुगले पाहिजे ( छाती नाही ) आणि श्वास बाहेर सोडताना पोट आत गेले पाहिजे. श्वास आत घेतल्या नंतर श्वास रोखून धरण्याचे व नंतर श्वास बाहेर सोडण्याची प्रक्रिया पूर्ण होते. याचे प्रमाण १ : ४ : २ असे आहे. म्हणजे हळहळू ५ सेकंदात श्वास आत घ्यायचा. नंतर २० सेकंद श्वास रोखून धरायचा. त्यानंतर १० सेकंदात हळूहळू श्वास बाहेर सोडायचा. हा व्यायाम रोज १० मिनिटे केल्यास त्याचा उत्तम लाभ मिळेल. यामुळे भीती, ताण तणावही कमी होईल.
- डॉ. अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)
 

Web Title: Exercise Strengthen the Respiratory System, Understand 'Corona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.