एक्झिट पोलचा 'निकाल' 11 मार्चला !

By admin | Published: March 9, 2017 08:39 PM2017-03-09T20:39:25+5:302017-03-09T23:30:16+5:30

आता सर्वांच्या नजरा येत्या शनिवारी, 11 मार्चला जाहीर होणा‍ऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. पण या निकालासोबतच विविध वृत्तवाहिन्या , काही एजेन्सींनी केलेल्या Exit Poll चा 'निकाल'ही 11 मार्चलाच

Exit poll 'exit' on 11th March! | एक्झिट पोलचा 'निकाल' 11 मार्चला !

एक्झिट पोलचा 'निकाल' 11 मार्चला !

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच संपली.  उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले . आता सर्वांच्या नजरा येत्या शनिवारी, 11 मार्चला जाहीर होणा‍ऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. पण या निकालासोबतच विविध वृत्तवाहिन्या,काही एजन्सींनी केलेल्या Exit Poll चा 'निकाल'ही 11 मार्चलाच लागणार आहे. 
 
बुधवारी संध्याकाळी बरोबर 5 वाजून 30 मिनिटांनी निवडणूक आयोगाने घातलेल्या निर्बंधांची वेळ संपली आणि सर्व चॅनल, वेबसाइटनी आपआपल्या परीने निवडणुकांचे 'निकाल' सांगून टाकले. यामध्ये जवळपास सर्वांनीच भाजपाला 'सॉफ्ट कॉर्नर' दाखवला आहे.  अर्थात  Exit Poll किती बरोबर असतात याचा अनुभव भाजपासह सर्वच पक्षांना 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकांवेळी आला आहे.  स्वतः Exit Poll करणा-या एजन्सींनाही हे चांगलंच माहितीये.  त्यामुळे आता 11 तारखेला जेव्हा मतमोजणीला सुरूवात होईल तेव्हा 5 राज्यांसोबत एक्झिट पोलचाही 'निकाल' लागेल. 
एक नजर 5 राज्यांतील एक्झिट पोलवर-
उत्तर प्रदेश-
- टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये 403 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 190 ते 210 जागा मिळण्याची शक्यता,  समाजवादी पक्ष - कॉंग्रेसला 110 ते 130 जागा, बहुजन समाज पक्षाला 54 ते 57 जागा .
- नेटवर्क- 18 च्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपा 185 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पक्ष -काँग्रेसला 120 जागा आणि बसपला 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- एबीपी माझा-सीएसडीएस'च्या एक्झिट पोलमधील आकडेवारी वेगळी आहे. यामध्ये भाजपला 164-176 जागा, सपा-काँग्रेसला 156-169 जागा , बसपला 60-72 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 - इंडिया टीव्ही-सीव्होटरने केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठी पार्टी बनेल. यानुसार भाजपाला 185 जागा , समाजवादी पक्षाला 120 जागा आणि बसपाला 90  जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे 
 
मणिपूर-
-  टाइम्स नाऊ व्हीएमआरच्या  एक्झिट पोलनुसार मणिपूरमध्ये 60 जागांपैकी भाजपाला 25 ते 31, काँग्रेसला 17 ते 23 आणि इतर पक्ष व अपक्षांना 9 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज.
- इंडिया टीव्ही-सी.व्होटरच्या  एक्झिट पोलनुसार भाजपा 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरेल. तर काँग्रेसला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर अन्य पक्षांना 12 पर्यंत जागा मिळू शकतात. 
-न्यूज 24-  भाजपाला 25 ते 31 जागा,  काँग्रेसला 17 ते 23 जागा, इतरांना 09 ते 15 जागा
 
पंजाब-
 - आज तक आणि सीसेरो यांच्या एक्झिट पोलमधून पंजाबमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपा आघाडीला फक्त 4 ते 7 जागा,  काँग्रेसला 62 ते 71 जागा मिळण्याचा अंदाज  तर अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला 42 ते 51 जागा 
- इंडिया टीव्ही आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलनं पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. भाजपा + अकाली दल 9, काँग्रेस 45, तर आम आदमी पार्टीला 63 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज 
-इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार कॉंग्रेसला 60 जागा, आम आदमी पार्टीला 60 जागा तर अकाली दल आणि भाजपा आघाडीला 6 जागा
- इंडिया न्यूज एक्झिट पोलनुसार कॉंग्रेसला 55 जागा, आम आदमी पार्टीला 55 जागा तर अकाली दल आणि भाजपा आघाडीला 7 जागा
 
उत्तराखंड-
- इंडिया टुडे आणि सीसेरोने आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये कांटे की लढत झाल्याचे सांगितले आहे. या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे.  
 
-इंडिया टीव्ही आणि सीसेरोने आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळतील असा अंदाज  
 न्यूज-24 आणि टुडेज चाणक्य-  53 जागा मिळवून भाजपाचे सत्तेत पुनरागमन करेल तर कॉंग्रेसला 15 जागा मिळण्याचा अंदाज
 
 गोवा-
-इंडिया टीवी सी. वोटरच्या अंदाजानुसार गोव्यामध्ये भाजपाला 15 ते 21, काँग्रेसला 12 ते 18 आणि आम आदमी पक्षाला 4 जागा मिळतील असा अंदाज अन्य पक्षांना 2 ते 8 जागा 
 
-टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये 40 जागांपैकी भाजपाला 18 जागा, कॉंग्रेस 15 जागा आणि आम आदमी पार्टीला 2 तर इतरांना 5 जागा मिळण्याचा अंदाज.
 
 
 

Web Title: Exit poll 'exit' on 11th March!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.