Exit Poll : मिझोरममध्ये काँग्रेस मागे जाणार, MNF ला सर्वाधिक जागा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 11:08 PM2018-12-07T23:08:10+5:302018-12-07T23:14:54+5:30
पूर्वांचलमधील मिझोरम राज्यात काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागणार आहे.
नवी दिल्ली - पूर्वांचलमधील मिझोरम राज्यात काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागणार आहे. कारण, एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मिझोरममध्ये मिझोरम नॅशनल फ्रंटाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल. मिझोरमच्या 40 जागांसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकांचा निकाल 11 डिसेंबर रोजी लागणार आहे.
मिझोरममध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. तर सरकार बनविण्यासाठी कुठल्याही पक्षाला 21 जागांची आवश्यकता आहे.
मिझोरमचा एक्झिट पोल
रिपब्लिक सी वोटर : काँग्रेस- 14-18, एमएनएफ- 16-20, इतर 3-10
टाईम्स नाऊ-सीएनएक्स : काँग्रेस 16, एमएनएफ- 18, इतर 6
या एक्झिट पोलच्या आकडेवाडीवरुन मिझोरमध्ये सत्ताबदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या ललथनहावला यांना अँटीइन्कमबंसीचा सामना करावा, लागणार आहे. दरम्यान, 2013 च्या निवडणुकांमध्ये मिझोरमध्ये काँग्रेसला 34 जागांवर घवघवीत यश मिळाले होते. तर, मोझो नॅशनल फ्रंटला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले होते.