Exit Poll: उत्तर प्रदेशमध्ये 26 वर्षांनी फुलणार कमळ

By admin | Published: March 9, 2017 05:48 PM2017-03-09T17:48:57+5:302017-03-09T19:51:58+5:30

उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या एक्झीट पोलमधून आलेल्या आकडेवारीनुसार भाजपाची सत्ता

Exit poll: Uttar Pradesh will be full of loser 26 years | Exit Poll: उत्तर प्रदेशमध्ये 26 वर्षांनी फुलणार कमळ

Exit Poll: उत्तर प्रदेशमध्ये 26 वर्षांनी फुलणार कमळ

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9 - देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारं राज्य अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेसाठी 7 टप्प्यांमध्ये मतदान पूर्ण झालं असून आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर यायला सुरूवात झाली आहे.  टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये 26 वर्षांनी कमळ फुलण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागू शकतं.  उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता स्थापन होईल अशी आकडेवारी या एक्झिट पोलमध्ये समोर आली आहे. 

या एक्झिट पोलमध्ये 403 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 190 ते 210 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुमतासाठी 202 जागा मिळण्याची आवश्यकता असल्याने एक्झिट पोलनुसार भाजपाची एकहाती सत्ता येऊ शकते.  एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर उत्तरप्रदेशमध्ये जवळपास 26 वर्षांनी भाजपाची एकहाती सत्ता येईल.  टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने जाहिर केलेल्या एक्झीट पोलमध्ये समाजवादी पक्ष - कॉंग्रेसला 110 ते 130 जागा, बहुजन समाज पक्षाला 54 ते 57 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एक नजर इतर Exit Poll वर- 

- नेटवर्क- 18 च्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपा 185 जागा मिळवून लर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पक्ष -काँग्रेसला 120 जागा आणि बसपला 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- एबीपी माझा-सीएसडीएस'च्या एक्झिट पोलमधील आकडेवारी वेगळी आहे. यामध्ये भाजपला 164-176 जागा, सपा-काँग्रेसला 156-169 जागा , बसपला 60-72 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
- इंडिया टीव्ही-सीव्होटरने केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठी पार्टी बनेल. यानुसार भाजपाला 185 जागा , समाजवादी पक्षाला 120 जागा आणि बसपाला 90  जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  
 
उत्तर प्रदेशमध्ये 2012 च्या निवडणुकीसाठी 59.40 % मतदान झालं होतं, तर यावेळेस   60.03% टक्के मतदान झालं. नेमका निकाल काय लागतो हे 11 मार्चला कळेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाला 224 जागा, बहुजन समाज पक्षाला 80 जागा , भाजपाला 47 जागा आणि कॉंग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या. तर  24 जागा अपक्ष आणि इतर पक्षांना मिळाल्या होत्या. त्यातही केवळ 6 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. 

Web Title: Exit poll: Uttar Pradesh will be full of loser 26 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.