एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2024 08:34 AM2024-10-09T08:34:16+5:302024-10-09T08:35:46+5:30

हरयाणातील अंदाज सपशेल फसले, जम्मू-काश्मीरमध्ये बसले; निम्म्यापेक्षा जास्त अंदाज चुकले

exit polls fails in haryana and jammu kashmir assembly election 2024 after result | एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता

एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता

मनोज रमेश जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकींचे एक्झिट पाेल जाहीर झाले हाेते. त्यात हरयाणात काॅंग्रेस तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल काॅन्फरन्स व काॅंग्रेस आघाडीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला हाेता. मात्र, हरयाणाच्या बाबतीत एक्झिट पाेल पूर्णपणे आपटले. तर जम्मू-काश्मीरबाबत सरकार काेणाचे येणार, हा अंदाज खरा ठरला, तरीही बरेच अंदाज चुकले आहेत.

हरयाणामध्ये भाजपचा दारुण पराभव हाेईल आणि काॅंग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला हाेता. nमात्र, प्रत्यक्षात झाले उलट. भाजपने बहुमत मिळविताना सलग तिसऱ्यांदा सत्ता
कायम ठेवण्याचा इतिहास हरयाणात घडविला आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर निवडणूक झाल्यामुळे या निकालाबाबत उत्सुकता हाेती. कलम ३७० हटविल्यानंतर ही पहिलीच निवडणूक हाेती. एक्झिट पाेल्सनी नॅशनल काॅन्फरन्स-काॅंग्रेस आघाडीचे सरकार स्थापन हाेईल, असा अंदाज वर्तविला हाेता. ताे खरा ठरला आहे. मात्र, भाजपला मिळणाऱ्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले आहेत.

हरयाणा विधानसभा 

एकूण जागा - 90 I बहुमत - 46

सर्व्हे करणारी संस्था    भाजपसहित    काँग्रेससहित     अन्य
    एनडीए    इंडिया आघाडी    
ध्रुव रिसर्च    २७    ५७    ०-६
सीएनएन२४    २१    ५९    १०
रिपब्लिक मॅट्रिज    १८-२४    ५५-६२    २-५
पीपल्स-पल्स    २०-३२    ४९-६१    ०-५
इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडिया    २१    ५९    २-६
डेटाअंश-रेड माईक    २०-२५    ५०-५५    ०-४
मनी कंट्रोल    २४    ५८    ६
प्रत्यक्ष निकाल    ४८    ३७    ५

जम्मू-काश्मीर विधानसभा

एकूण जागा - 90 I बहुमत - 46

सर्व्हे करणारी     भाजप    काँग्रेस, नॅशनल    पीडीपी    अन्य
संस्था        कॉन्फरन्स आघाडी        
एबीपी-सी व्होटर्स    २७-३२    ४०-४८    ६-१२    ६-११
रिपब्लिक मॅट्रिज    २५    २७    २८    ७
पीपल्स-पल्स    २३-२७    ४६-५०    ७-११    ४-६
मनी कंट्रोल    २६    ४०    ७    १७
प्रत्यक्ष निकाल    २९    ४८    ३    १०

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकांत जर त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, असाही अंदाज काही संस्थांनी वर्तविला हाेता. ताे देखील चुकीचा ठरला.

 

Web Title: exit polls fails in haryana and jammu kashmir assembly election 2024 after result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.