Exit Polls: उत्तर प्रदेशसह तीन राज्यांत कमळ? काय सांगतात ‘पोल ऑफ पोल्स’चे कल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 06:38 AM2022-03-08T06:38:57+5:302022-03-08T06:40:49+5:30

Exit Polls assembly Election: पंजाब : आपच्या झाडूने सगळे साफ; उत्तराखंड : भाजप गड राखण्याची शक्यता; मणिपूर : पुन्हा फडकू शकते भाजपचे निशाण

Exit Polls UP, Punjab, Goa, Manipur, Uttarakhand: BJP in three states including Uttar Pradesh? What is the trend of ‘Pole of Poles’? | Exit Polls: उत्तर प्रदेशसह तीन राज्यांत कमळ? काय सांगतात ‘पोल ऑफ पोल्स’चे कल?

Exit Polls: उत्तर प्रदेशसह तीन राज्यांत कमळ? काय सांगतात ‘पोल ऑफ पोल्स’चे कल?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्ये  भाजपची सत्ता येणार असा निष्कर्ष बहुतांश जनमत चाचण्यांतून काढण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या सध्या असलेल्या ३०२ जागांमध्ये घट होऊन त्या पक्षाला २४० ते २६२ जागा मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचा गड राखला जाणे हेच भाजपसाठी मोठे यश ठरणार आहे. त्या राज्यात भाजपला जोरदार टक्कर देणाऱ्या समाजवादी पक्षाला किमान १५० जागा मिळतील, असा अंदाज आहे. पंजाबमध्ये आप पक्ष सत्तेवर येण्याचा होरा जनमत चाचण्यांनी व्यक्त केला आहे. 

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहेत. या निवडणुकांपैकी उत्तर प्रदेशमधील सातव्या टप्प्यातले मतदान सोमवारी पूर्ण झाले. त्यानंतर जाहीर झालेल्या जनमत चाचण्यांतील निष्कर्षांनुसार भाजप उत्तर प्रदेशमधील सत्ता कायम राखणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून, विविध जनमत चाचण्यांमध्ये भाजपला पुढीलप्रमाणे जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

गोवा : त्रिशंकू स्थिती निर्माण होणार
गोव्यामध्ये भाजप व काँग्रेसला कदाचित सारख्या जागा मिळून, तिथे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, असे म्हटले जात आहे. मणिपूर व उत्तराखंडमध्ये भाजप सत्तेवर येईल, असे पोल ऑफ पोल्सच्या निष्कर्षांतून सूचित होत आहे.  

मोठ्या राज्यांत काँग्रेसचे काय होणार? 
पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बहुतांश जनमत चाचण्यांच्या निष्कर्षांप्रमाणे काँग्रेसला कमी जागा मिळण्याची शक्यता. 

Web Title: Exit Polls UP, Punjab, Goa, Manipur, Uttarakhand: BJP in three states including Uttar Pradesh? What is the trend of ‘Pole of Poles’?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.