आगामी वर्षात २.८० लाख नव्या केंद्रीय नोकऱ्या अपेक्षित
By admin | Published: March 3, 2017 04:22 AM2017-03-03T04:22:11+5:302017-03-03T04:22:31+5:30
आगामी वित्तीय वर्षात केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये २.८० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या सहपत्रांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आगामी वित्तीय वर्षात केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये २.८० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर, केंद्रीय सीमाशुल्क, पोलीस या खात्यांत अधिक नोकऱ्या निर्माण होणार आहेत.या सहपत्रांपैकी एक सहपत्र केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील सध्याची व आगामी वर्षातील अपेक्षित कर्मचारी संख्या दर्शविणारे आहे. यानुसार अपेक्षित असलेली सर्व नव्या कर्मचाऱ्यांची भरती आगामी वर्षात केली जाईलच, याची खात्री नाही. परंतु संबंधित खात्याला तेवढ्या जास्त कर्मचाऱ्यांची गरज आहे व त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूद केली गेली आहे, असे यावरून सूचित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>प्राप्तिकर विभागात सर्वाधिक भरती
नोटाबंदीनंतर काळ्या पैशाविरुद्ध मोहीम राबविण्याची जबाबदारी असलेल्या प्राप्तिकर विभागात यापैकी सर्वाधिक नवे कर्मचारी घेतले जाणे अपेक्षित आहे. या विभागाची कर्मचारीसंख्या सध्याच्या ४६ हजारांवरून वाढून मार्च २०१८पर्यंत ८० हजारांवर पोहोचेल, असे गृहीत धरण्यात आले आहे.
केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमाशुल्क विभागात नव्या कर्मचाऱ्यांची भरती होणे अपेक्षित आहे. या विभागात सध्या ५०,६०० कर्मचारी काम करतात. त्यात आगामी वर्षात ४१ हजारांनी वाढ होऊन कर्मचारीसंख्या ९१,७००वर पोहोचेल, असे गृहीत धरण्यात आले आहे.२००६ मध्येही सरकारने १.८८ लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या अपेक्षेने अर्थसंकल्पात तरतूद केली होती. परंतु प्राप्तिकर, केंद्रीय उत्पादन शुल्क आणि पोलीस या तीन विभागांमध्ये त्याप्रमाणात नवी भरती झाली नाही. परिणामी, निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या नव्या येणाऱ्या कर्मचाऱ्यांहून जास्त झाल्याने या विभागांची एकूण कर्मचारी संख्या सन
२०१५च्या तुलनेने २१ हजाराने रोडावली होती.1.88 लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या अपेक्षेने अर्थसंकल्पात तरतूद केली होती.
>इतर काही
अपेक्षित नोकऱ्या
परराष्ट्र मंत्रालय
2000
(सध्या 9,294)
माहिती व प्रसारण
2,246
(सध्या 4,012)
कॅबिनेट सचिवालय
287
(सध्या 1,218)