स्मार्ट होणार म्हणून सोलापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या (पान एक चौकट..)
By admin | Published: August 1, 2015 12:01 AM2015-08-01T00:01:12+5:302015-08-01T00:01:12+5:30
सोलापूर : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाकरिता सोलापूर शहराची निवड करण्याचा निर्णय राज्याच्या उच्चाधिकार समितीने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिल्याने सोलापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
Next
स लापूर : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाकरिता सोलापूर शहराची निवड करण्याचा निर्णय राज्याच्या उच्चाधिकार समितीने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिल्याने सोलापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सोलापूर आता स्मार्ट होणार म्हणून महापालिकेत आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सोलापूर शहर कसे असावे याचे स्वप्न साकार होण्याची संधी दार ठोठावत आहे. या योजनेतून सोलापूरच्या विकासासाठी पायाभूत सुविधांना निधी मिळणार आहे. यात पाणीपुरवठा, रस्ते विकास व उद्योजकांना सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कारकिर्दीपासून सोलापूरचे नाव स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत चर्चेला आले. प्रवेशिकेच्या ठरावावरून महापालिकेत राजकारण तापले होते खरे. पण आयुक्त काळम-पाटील यांनी सर्वांना विश्वासात घेऊन पाठपुरावा केला. यामुळे आता सर्वच राजकीय पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.