एटीएमच्या बदलांना दीड हजार कोटींचा खर्च

By admin | Published: November 17, 2016 02:28 AM2016-11-17T02:28:06+5:302016-11-17T02:28:06+5:30

एटीएम यंत्रातून नोटा मिळवण्याची सवय लागलेल्या नागरिकांना बँकेत जाऊन विड्रॉ स्लिपने पैसे काढणे अवघड जात आहे. मात्र हा

The expenditure of 1.5 billion crores for ATM changes | एटीएमच्या बदलांना दीड हजार कोटींचा खर्च

एटीएमच्या बदलांना दीड हजार कोटींचा खर्च

Next

राजू इनामदार / पुणे
एटीएम यंत्रातून नोटा मिळवण्याची सवय लागलेल्या नागरिकांना बँकेत जाऊन विड्रॉ स्लिपने पैसे काढणे अवघड जात आहे. मात्र हा त्रास त्यांना अजून काही महिने तरी सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. २ हजार रूपयांची चलनात आलेली नवी नोट तसेच भविष्यात येणारी ५०० रूपयांची नोट लांबी व रुंदीलाही आकारात वेगळी असल्याने देशभरातील अडीच लाखपेक्षा जास्त एटीएम यंत्रांचे सेटिंग बदलावे लागणार आहे.

कॉन्फिग्रेशन करावे लागेल- क्षेत्रातील काही तज्ञांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतची तांत्रिक माहिती दिली.
एटीएम यंत्रात फिक्स डायमेन्शन व डायनॅमिक डायमेन्शन अशा दोन पैकी एक कॅसेट असते. यातील कोणत्याही कॅसेटमध्ये नव्या २00 रूपयांच्या नोटेचे कॉन्फ्रिेगेशन करायचे असेल तर हार्डवेअर व सॉफ्टवेअर असा दोन्हींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर फक्त १०० रूपयांच्या नोटा मिळण्यासाठीच हे यंत्र उपयुक्त ठरेल.
सॉफ्टवेअरमध्ये करावा लागेल बदल तांत्रिक बदल केल्यानंतरही एटीएम लगेचच नव्या नोटा देण्यासाठी सज्ज असेल असे नाही. त्यासाठी बँकेला एटीएम यंत्राच्या अ‍ॅप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हाईडरला याबाबत माहिती देणे गरजेचे असते. कॅसेट १ ते ४ अशी प्रत्येक कॅसेटची स्वतंत्र माहिती पुरवावी लागेल. ती यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यास असलेले सॉफ्टवेअर बदलावे लागेल.
एटीएममध्ये कॅसेट टाकाव्या लागतील...
ज्या एटीएम यंत्रांमध्ये दोनच कॅसेट वापरल्या जात आहेत, (फक्त ५०० व १०० च्या नोटा किंवा १ हजार व ५०० च्या नोटा) त्यांना आणखी दोन कॅसेटचा संच यंत्राला बसवावा लागणार आहे. यासाठीचा अंदाजे खर्च ७० ते ८० हजार इतका आहे. अशी किमान लाखभर यंत्रे असावीत असा अंदाज आहे.
पूर्वीपेक्षा अधिक मूल्याच्या नोटा-
डायनॅमिक डायमेन्शनच्या कॅसेटमध्ये दोन फ्यूज असतात. त्या फ्यूजवरून कॅसेटचे डायमेन्शन नव्या नोटेच्या आकाराप्रमाणे बदलून घ्यावे लागणार आहे.
फिक्स डायमेन्शच्या कॅसेटमध्ये नव्या नोटेच्या आकाराची वेगळी कॅसेटच बसवावी लागेल.
२ हजारांची नोट आकारात जास्त असली तरी जाडीमध्ये अगदीच कमी असल्याने पुर्वीपेक्षा जास्त नोटा यंत्रात बसतील. त्यांचे मुल्यही २ हजार म्हणजे पुर्वीपेक्षा दुप्पट असल्याने जास्त पैसे मिळतील.

Web Title: The expenditure of 1.5 billion crores for ATM changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.