माझ्या उपचारांचा खर्च डे यांनी करावा
By admin | Published: February 24, 2017 01:30 AM2017-02-24T01:30:23+5:302017-02-24T01:30:23+5:30
स्तंभलेखक शोभा डे यांनी पोलीस निरीक्षकाच्या अतिस्थूल शरीरयष्टीबद्दल टिष्ट्वटरवर केलेल्या
निमच (मध्य प्रदेश) : स्तंभलेखक शोभा डे यांनी पोलीस निरीक्षकाच्या अतिस्थूल शरीरयष्टीबद्दल टिष्ट्वटरवर केलेल्या मतप्रदर्शनावर त्याने तीव्र नापसंती व्यक्त केली असून माझे स्थूलत्व हे अति आहारामुळे नव्हे हार्मोनल डिसआॅर्डरचा परिणाम आहे, असे म्हटले.
माझ्या स्थूल शरीराची शोभा डे यांनी टिष्ट्वटरवर जी थट्टा केली त्यामुळे मी दुखावलो असून १९९३ मध्ये माझ्या पित्ताशयावर झालेल्या शस्त्रक्रियेने निर्माण झालेल्या संप्रेरकातील बिघाडाचा परिणाम म्हणजे वाढलेले वजन आहे, असे निरीक्षक दौलतराम जोगेवात यांनी म्हटले. जोगेवात यांचे वय ५८ वर्षे असून त्यांचे वजन सुमारे १८० किलो आहे.
डे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतदान झाल्यानंतर टिष्ट्वटरवर या पोलिसाचे छायाचित्र अपलोड केले. ‘‘मुंबईत आज प्रचंड पोलीस बंदोबस्त’’, असे डे यांनी त्या छायाचित्रासह भाष्य केले होते. जोगेवात हे मुंबई पोलीस दलातील असून त्यांची या निवडणुकीसाठी नियुक्ती झाल्याचा चुकीचा समज डे यांचा झाला होता. त्यांचे टिष्ट्वट व्हायरल होताच नेटिझन्सनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्यावर जोरदार टीका करताना मुंबई पोलिसांनी टिष्ट्वट केले. ‘‘आम्हालासुद्धा शाब्दिक कोटी करता येते श्रीमती डे, परंतु ही कोटी मात्र पूर्णपणे अस्थानी ठरली. गणवेश आणि कर्मचारी आमचा नाही. आम्हाला अधिक चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.’’
गोंधळ शांत करण्यासाठी डे यांनी बुधवारी नव्याने टिष्ट्वट केले. त्यात म्हटले की :‘‘मुंबई/महाराष्ट्र पोलीस प्रणाम. दुखावण्याचा हेतू नव्हता. मध्य प्रदेशच्या पोलिसाने जर हे छायाचित्र अस्सल असेल तर आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.’’ डे यांनी गेल्या वर्षीच्या आॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करणार नाहीत, असे टिष्ट्वट केले होते.
त्यावरूनही त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. (वृत्तसंस्था)
मी वरिष्ठांशी चर्चा करणार आहे
कोणाला सडपातळ व्हायला आवडणार नाही? शोभा डे यांची इच्छा असेल तर त्या माझ्यावरील उपचारांचा खर्च करू शकतात, असे ते म्हणाले. जोगेवात यांची येथील पोलीस लाइनमध्ये नियुक्ती आहे. ते म्हणाले, ‘‘माझ्या स्थुलत्वाच्या करण्यात आलेल्या थट्टेबद्दल मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करणार आहे. मी आता काय करायला पाहिजे हा आता त्यांचा प्रश्न आहे.’’ ते २०१९ मध्ये सेवानिवृत्त होतील.