BMW पेक्षाही महागडा साप...कारण?

By admin | Published: April 6, 2017 02:29 PM2017-04-06T14:29:45+5:302017-04-06T14:29:45+5:30

सोनेरी रंग असलेल्या रेड सॅंड बोआ नावाच्या या सापाची किंमत काळ्या बाजारात बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज बेंज या अलीशान गाड्यांपेक्षाही जास्त

An expensive snake than BMW ... Reason? | BMW पेक्षाही महागडा साप...कारण?

BMW पेक्षाही महागडा साप...कारण?

Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 6 - सोनेरी रंग असलेल्या रेड सॅंड बोआ नावाच्या या सापाची किंमत काळ्या बाजारात बीएमडब्ल्यू एक्स-6 (1.2 कोटी रुपये) आणि मर्सिडीज बेंज एस क्लास (1.19 कोटी रुपये) या अलीशान गाड्यांपेक्षाही जास्त आहे. जवळपास दीड ते दोन कोटींमध्ये या सापाची विक्री होते.  याच कारणामुळे तस्करांसाठी या सापाची डिमांड खूप जास्त आहे. वजन जितकं जास्त तितकं काळ्या बाजारात सापाची किंमत जास्त असते त्यामुळे तस्कर या सापाला स्टीलच्या गोळ्या खायला देतात. त्यामुळे या सापाचं वजन वाढतं. बिहारच्या अररियामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दिवसांपूर्वी एका तस्कराकडून दोन साप पकडले. या सापांची किंमत 3 कोटींपेक्षाही जास्त असल्याचं बोललं जात आहे.   
 
का आहे इतकी किंमत-
सेक्स पॉवर वाढवण्यासाठी खातात हा साप-
 
- चीनमध्ये या सापाचा वापर सेक्स पावर वाढवणारं औषध म्हणून केला जातो. याशिवाय ताकद वाढवण्यासाठी हा साप येथे खाल्ला जातो. 
 
- हा साप खाल्ल्याने माणूस नेहमी तरूण राहतो असा आखाती देशांमध्ये समज आहे. तसेच या सापामुळे दुर्धर आजार बरे होतात असंही येथे बोललं जातं.  
 
- या सापाला खाल्ल्यामुळे एड्स सारख्या आजाराचं निदान होतं असं बोललं जातं त्यामुळे अनेक देशांमध्ये या सापाची डिमांड आहे.
भारतात या सापाला धनदेवता कुबेरसोबत जोडलं जातं. या सापाचं दर्शन भारतात शुभं मानलं जातं, या शिवाय तंत्रमंत्रामध्येही रेड सॅंड बोआ या सापाचा उपयोग केला जातो.     
 
 
 

Web Title: An expensive snake than BMW ... Reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.