चिंताजनक! H3N2 नं बदललं रूप, अचानक वाढलेल्या रुग्णांमुळे तज्ज्ञही चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 10:32 AM2023-03-11T10:32:11+5:302023-03-11T10:33:09+5:30

देशभरात इन्फ्लूएंझा ए सब टाईप H3N2 च्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.

Experts alert virus changing pattern hospitalisation to go up H3N2 two deaths reported in India karnataka | चिंताजनक! H3N2 नं बदललं रूप, अचानक वाढलेल्या रुग्णांमुळे तज्ज्ञही चिंतेत

चिंताजनक! H3N2 नं बदललं रूप, अचानक वाढलेल्या रुग्णांमुळे तज्ज्ञही चिंतेत

googlenewsNext

देशभरात इन्फ्लूएंझा ए सब टाईप H3N2 च्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांमध्ये विषाणूच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय आणि अनपेक्षित बदल झाल्याची माहिती दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील आरोग्य तज्ज्ञांनी गुरुवारी दिली. देशभरातील रुग्णालयांमध्ये H3N2 इन्फ्लूएंझाची हजारो रुग्णांची नोंद होत आहे.

H3N2 विषाणूमुळे वैद्यकीय समस्या उद्भवत आहेत, प्रामुख्यानं फुफ्फुसांच्या संसर्गाचं कारण ठरत आहेत आणि या विषाणूनं गेल्या सहा महिन्यांमध्ये आपला पॅटर्नही बदलला असल्यानं या विषाणू बाबतची चिंता वाढल्याचं मिंटनं दिलेल्या वृत्तात म्हटलंय. "गेल्या सहा महिन्यांमध्ये विषाणूच्या पॅटर्नमध्ये अनपेक्षित बदल झाले आहेत. सामान्यत: आपण इन्फ्लूएन्झारजे नंबर १ व्हायरच्या रुपात पाहतो. यावेळी इन्फ्लूएन्झा ए विशाण सब टाईप H3N2 नं श्वसन मार्गाचे अनेक संर्सग निर्माण केले आहेत," अशी प्रतिक्रिया सर गंगाराम रुग्मालयाचे सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. धीरेन गुप्ता यांनी दिली.

"आणखी एक निरीक्षण- टाईप बी इन्फ्लुएंझानं एआरडीएसच्या रुपात फुफ्फुसाच्या अधिक गंभीर समस्या निर्माण केल्या आहेत. गंभीर निमोनियाला व्हेंटिलेशनची आवश्यकता असते. एडनोव्हायरस हा एक असा विषाणू आहे जो आणखी एका गंभीर आजाराला कारणीभूत ठरत आहे," असं डॉ. गुप्ता म्हणाले.

“गेल्या २ महिन्यांत, एडिनोव्हायरसमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामुळे रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावं लागत आहे (दोन महिन्यांत ११ रुग्णांना PICU ची आवश्यक होती.)" अशी माहितीही त्यांनी दिली. डीएनए विषाणू मुख्यत्वे वरील श्वसन प्रणालीवर परिणाम करतात आणि डोळ्यांच्याही समस्या निर्माण करतात. याचा प्रसास करोनाप्रमाणेच होतो," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

६० उपप्रकार
एडेनोव्हायरस एक डीएनए विषाणू आहे, ६० पेक्षा जास्त उपप्रकारांसह, गंभीर आजारांना सेरोटाईप ७, १४, सेरोटाईप १५,२१,१४ शी संबंधित आहे. प्रामुख्याने वरच्या श्वसनमार्गावर आणि डोळ्यांवर याचा परिणाम होतो. इम्युनोकॉम्प्रोमाइज्डमध्ये हे न्यूमोनियाचे कारणही ठरू शकते. विशेष म्हणजे तो कोरोनासारखाच वेगानं पसरतो. पूर्वी असं वाटलं होतं की हा विषाणू प्रामुख्यानं दोन वर्षांपेक्षा कमी काळासाठी प्रभावित करतो, परंतु या वर्षी त्याचं रुप निराळं होतं, सिडोफोव्हिरचा उपयोग इम्युनोकॉम्प्रोमाइज्डमध्ये प्रोगरेसिव्ह आजारांत केला जाऊ शकतो, असं ते म्हणाले.

Web Title: Experts alert virus changing pattern hospitalisation to go up H3N2 two deaths reported in India karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.