CoronaVirus News: राज्यांना कोरोना लस विकत घ्यावी लागणार नाही, केंद्र सरकारच करणार व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:02 PM2020-08-12T23:02:46+5:302020-08-12T23:07:49+5:30
या बैठकीत लसीकरणासाठी लोकांचे समूह निर्धारीत करण्याबरोबरच देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित होत असलेल्या लसी विकत घेण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.
नवी दिल्ली - कोरोना लसीसंदर्भात तयार करण्यात आलेल्या टास्कफोर्सने आपल्या पहिल्याच बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यावेळी, कोरोना लसींची खरेदी राज्यांना करावी लागणार नाही. तर केंद्र सरकार स्वतःच लसींची व्यवस्था करेल, असा निर्णयही घेण्यात आला. कोविड-19 ची लस उपलब्ध करवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्स्कफोर्सने बुधवारी आपली पहिली बैठक घेतली.
या बैठकीत लसीकरणासाठी लोकांचे समूह निर्धारीत करण्याबरोबरच देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित होत असलेल्या लसी विकत घेण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.
नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही. के. पॉल हे बैठकीचे अध्यक्ष होते. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, टास्कफोर्सने सर्व राज्यांना सल्ला दिला आहे, की त्यांनी लसीच्या खरेदीसाठी वेगवेगळे मार्ग निवडू नये. यावेळी सदस्यांनी कोविड-19 च्या लसीची निवड करण्यासाठी दिशा निर्देशांच्या मापदंडांवरही चर्चा केली. याशिवाय त्यांनी एनटीएजीआयच्या एका आरोग्य उप-समितीकडून माहितीही मागवली आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे, की यावेळी लसीकरण प्रक्रिया, लसीचे व्यवस्थापन तसेच वितरण तंत्र, देशात तसेच देशाबाहेर विकसित होणाऱ्या कोविड-19 च्या लसींच्या खरेदीची प्रणाली, तसेच लसीकरणासाठी लोकांचे समूह निर्धारित करण्यावरही चर्चा झाली.
तज्ज्ञांच्या या गटाने लसींच्या खरेदीसाठी आवश्यक आर्थिक संसाधने आणि अर्थ सहाय्य करण्यासंदर्भातील विविध पर्याय, लसीचे वितरण करण्यासाठी उपलब्ध पर्याय, तसेच लसीकरणाची व्यवस्था करण्यासंदर्भातही चर्चा केली.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर
कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम
दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा
CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस