जुन्या नोटा वापरण्यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

By admin | Published: November 11, 2016 07:34 PM2016-11-11T19:34:54+5:302016-11-11T19:34:54+5:30

500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटा वापरण्याबाबत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे आता या नोटांचा वापर ठरावीक ठिकाणी करता येणार आहे.

Expiry until November 14 to use old notes | जुन्या नोटा वापरण्यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

जुन्या नोटा वापरण्यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11 -  500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटा वापरण्याबाबत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या नोटा वापरून बिलं भरण्यासाठी  72 तासांची म्हणजे 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या नोटांचा वापर ठरावीक ठिकाणी करता येणार आहे. 

पेट्रोलपंप, एसटी प्रवास, रेल्वे प्रवास, वीज बिलचा भरणा ,न्यायालयातील फी भरताना किंवा कर भरण्यासाठी जुन्या नोटांचा वापर 14 नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे. यापुर्वी याठिकाणांवर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी सरकारने जी मुदत दिली होती ती आज मध्यरात्रीनंतर संपत होती. आता ही मुदत 14 नोव्हेबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे.  
 
त्यानंतर तुमच्याकडच्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून घ्यायच्या असतील, तर केवळ बँक आणि पोस्ट ऑफिस हे दोनच  पर्याय असणार आहेत.
 

Web Title: Expiry until November 14 to use old notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.