२,९०० कोटींचे बेकायदा व्यवहार उघडकीस

By admin | Published: May 8, 2017 01:32 AM2017-05-08T01:32:32+5:302017-05-08T01:32:32+5:30

प्रत्यक्ष व्यवहार न करणाऱ्या व २,९०० कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवणाऱ्या ३३९ कंपन्यांचे (शेल कंपन्या) जाळे केंद्रीय गुप्तचर

Explain illegal transactions of Rs 2,900 crore | २,९०० कोटींचे बेकायदा व्यवहार उघडकीस

२,९०० कोटींचे बेकायदा व्यवहार उघडकीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : प्रत्यक्ष व्यवहार न करणाऱ्या व २,९०० कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवणाऱ्या ३३९ कंपन्यांचे (शेल कंपन्या) जाळे केंद्रीय गुप्तचर खात्याने चौकशीत उघडकीस आणले आहे. गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारचे व्यवहार करणाऱ्या कंपन्यांचा सीबाआय शोध घेत असताना या जाळ्याचा शोध लागला. संशयितांनी त्या प्रत्यक्ष व्यापार न करणाऱ्या कंपन्यांचा वापर कर्जाची विशिष्ट हेतूसाठी असलेली रक्कम कर चुकवण्यासाठी व काळा पैसा निर्माण करण्यासाठी बनावट दस्तावेज बनवून वळवली, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. शेल कंपन्यांच्या माध्यमातून बनावट आयातीसाठी पैसे अदा केल्याचे भासवून विदेशात पैसा पाठवला गेला व नंतर हाच पैसा विदेशी गुंतवणूक दाखवून भारतात आणण्यात आला. २८ बँकांतील कर्र्ज घोटाळ्याच्या सीबीआय तपास करीत आहे.

Web Title: Explain illegal transactions of Rs 2,900 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.