शरजील इमामच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 09:45 AM2020-02-01T09:45:44+5:302020-02-01T09:53:47+5:30

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) ला विरोध करताना देश तोडण्याची भाषा केल्याने शरजील इमाम याला अटक करण्यात आली होती.

Explain shocking information from Sharjeel Imam's mobile and laptop | शरजील इमामच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती उघड

शरजील इमामच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती उघड

Next
ठळक मुद्देशरजील इमामच्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या तपासणीमधून धक्कादायक माहिती समोरशरजीलने सीएए आणि एनआरसीविरोधात पत्रके छापली होती, तसेच त्यामध्ये दिशाभूल करणारे आणि  भीती पसरवणारा उल्लेखअलीगड आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील चिथावणीखोर भाषणांप्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत

नवी दिल्ली - सीएए आणि एनआरसीला विरोध करताना प्रक्षोभक भाषण देणाऱ्या शरजील इमामच्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या तपासणीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरजीलने सीएए आणि एनआरसीविरोधात पत्रके छापली होती, तसेच त्यामध्ये दिशाभूल करणारे आणि  भीती पसरवणारा उल्लेख होता. तसेच ही पत्रके त्याने अनेक मशिदींमध्ये वाटली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  

 नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) ला विरोध करताना देश तोडण्याची भाषा केल्याने शरजील इमाम याला अटक करण्यात आली आहे. शरजीलच्या बिहारमधील जहानाबाद येथील घरातून आणि दिल्लीतील वसंत कुंज येथे असलेल्या फ्लॅटमधून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सीएएविरोधातील पोस्टर जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील अलीगड येथील न्यायालयाने शरजीलला पोलीस कोठडीत घेण्यासाठी शुक्रवारी वॉरंट जारी केले आहे. 



 शरजील इमाम याला देशद्रोहाच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिहारमधील जहानाबाद येथून अटक केली होती. दरम्यान, अलीगड आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील चिथावणीखोर भाषणांप्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. तपासादरम्यान वसंत कुंज येथील शरजीलच्या भाड्याच्या फ्लॅटमधून एक लॅपटॉप आणि एक संगणक जप्त करण्यात आला आहे, असे पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी सांगितले. 

देश तोडण्याची भाषा करणारा शरजील 'प्रेयसी'मुळे फसला जाळ्यात; 'असा' आखला पोलिसांनी प्लॅन

JNU Protest : देशद्रोही विधान करणारा जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अटक

शरजील इमामनंतर या तरुणीच्या वक्तव्यावरून वादंग, अफझल गुरू निर्दोष असल्याचा केला दावा

 दरम्यान, शरजीलने मशिदींमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधाती पत्रके वाटली होती. ज्यामध्ये दिशाभूल करणारे आणि भीती निर्माण करणारे उल्लेख होते. तसेच पोलिसांनी याच्या पत्रकाच्या प्रती जप्त केल्या आहेत. तसेच या प्रतींची झेरॉक्स ज्या दुकानातून काढण्यात आली त्याचीही ओळख पटवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

Web Title: Explain shocking information from Sharjeel Imam's mobile and laptop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.