अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या वर्णनावरुन घेतला शोध : २४ तासात गुन्हा उघडकीस आणण्यात यश

By admin | Published: January 3, 2017 07:23 PM2017-01-03T19:23:57+5:302017-01-03T19:23:57+5:30

जळगाव : बंदुकीचा धाक दाखवून दारुच्या नशेत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणार्‍या किरण वसंत कोळी (रा.अकलुद, ता.यावल) व त्याचा साथीदार तथा मावस मेहुणा वासुदेव नारायण तायडे (रा.रायपुर, ता.रावेर) या दोन्ही संशयितांना अवघ्या २४ तासात जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. कोणताही पुरावा अथवा धागादोरा नसताना केवळ वर्णनावरुन पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी दिली.

Explaining the misplaced misdeeds of a minor girl, a search was conducted in 24 hours. | अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या वर्णनावरुन घेतला शोध : २४ तासात गुन्हा उघडकीस आणण्यात यश

अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या वर्णनावरुन घेतला शोध : २४ तासात गुन्हा उघडकीस आणण्यात यश

Next
गाव : बंदुकीचा धाक दाखवून दारुच्या नशेत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणार्‍या किरण वसंत कोळी (रा.अकलुद, ता.यावल) व त्याचा साथीदार तथा मावस मेहुणा वासुदेव नारायण तायडे (रा.रायपुर, ता.रावेर) या दोन्ही संशयितांना अवघ्या २४ तासात जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. कोणताही पुरावा अथवा धागादोरा नसताना केवळ वर्णनावरुन पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी दिली.
भुसावळ येथील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणी व तिचा मित्र हे दोघं जण फिरायला गेले असताना रविवारी संध्याकाळी साडे सहा ते सात वाजेच्या सुमारास यावल रस्त्यावरील अकलुद शिवारात रस्त्याच्या बाजुला गप्पा मारत असताना किरण कोळी व त्याचा मावस मेहुणा वासुदेव तायडे हे दोघं जण त्या रस्त्याने जात होते. तरुण-तरुणी एकांतात असल्याचे पाहून किरण याने सोबत असलेल्या एअरगनचा दोघांना धाक दाखविला. नंतर ही एअरगन वासुदेव जवळ देवून तरुणीला झुडपात नेवून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्यांच्याजवळील मोबाईल व दोन हजार ६० रुपये हिसकावून पळ काढला होता. याच वेळी गस्तीवर असलेले फैजपूर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सार्थक नेहते यांना पीडित तरुणी व तरुण रडतांना दिसून आले. त्यांनी घडलेला प्रकार नेहते यांना सांगितल्यावर तेही चक्रावले.
एलसीबी लागली कामाला
गुन्‘ाच्या गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी संशयिताच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले तर अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर सोमवारी संपुर्ण दिवसभर यावल, रावेर परिसरात ठाण मांडून होते. राजेशसिंह चंदेल यांनी सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे, नारायण सोनवणे, मनोहर देशमुख, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, रामकृष्ण पाटील, रवींद्र गायकवाड, योगेश पाटील, दिनेश बडगुजर, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिलीप येवले, सतीष हळणोर, अशोक चौधरी, इद्रीस पठाण, चंद्रकांत पाटील, रवींद्र पाटील, प्रकाश महाजन, लिलाकांत महाले, दत्तात्रय बडगुजर, नारायण पाटील, सुशील पाटील, जयंत चौधरी यांचे पथक तयार केले. संशयितांच्या वर्णनावरुन पथकाने रायपुर,गहुखेडा, अंजाळे व विंध्या पेपर मील आदी गावातून माहिती काढली. त्यात किरणचे नाव निष्पन्न झाले.

Web Title: Explaining the misplaced misdeeds of a minor girl, a search was conducted in 24 hours.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.