लष्कराच्या निधीचे गौडबंगाल उघड

By admin | Published: May 15, 2015 12:25 AM2015-05-15T00:25:52+5:302015-05-15T00:25:52+5:30

पंतप्रधान मदतनिधीत एकाही जवानाच्या वेतनातून योगदान देण्यात आले नसल्याचा खुलासा लष्कराने केल्यामुळे १०० कोटींच्या धनादेशाबद्दल औत्सुक्य

Explanation of the Army's funding | लष्कराच्या निधीचे गौडबंगाल उघड

लष्कराच्या निधीचे गौडबंगाल उघड

Next

नवी दिल्ली / मुंबई : पंतप्रधान मदतनिधीत एकाही जवानाच्या वेतनातून योगदान देण्यात आले नसल्याचा खुलासा लष्कराने केल्यामुळे १०० कोटींच्या धनादेशाबद्दल औत्सुक्य वाढले आहे. लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी चार महिन्यांपूर्वी या रकमेचा धनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर हा खुलासा समोर आला आहे.
कोणत्याही लष्करी जवानाच्या वेतनातून पंतप्रधान मदतनिधीत कोणतीही रक्कम योगदानाच्या स्वरुपात देण्यात आलेली नाही. ही बाब विचाराधीन आहे, असे लष्कराचे सीपीआयओ लेप्ट. कर्नल राजीव गुलेरिया यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) दाखल अर्जाला उत्तर देताना स्पष्ट केले. डेहाराडूनच्या प्रभू दंद्रियाल यांनी याबाबत माहिती मागितली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Explanation of the Army's funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.