मंत्री बनण्याआधीच दिला होता कंपनीतील पदाचा राजीनामा, पॅराडाइज पेपर्सप्रकरणी जयंत सिन्हांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 01:52 PM2017-11-06T13:52:18+5:302017-11-06T13:53:38+5:30

पॅराडाइज पेपर्समध्ये नाव आल्याने  अडचणीत आलेले केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Explanation of Jayant Sinha's resignation as Parrikar's resignation | मंत्री बनण्याआधीच दिला होता कंपनीतील पदाचा राजीनामा, पॅराडाइज पेपर्सप्रकरणी जयंत सिन्हांचं स्पष्टीकरण

मंत्री बनण्याआधीच दिला होता कंपनीतील पदाचा राजीनामा, पॅराडाइज पेपर्सप्रकरणी जयंत सिन्हांचं स्पष्टीकरण

Next
ठळक मुद्देमोदी सरकारमध्ये मंत्रिपदी विराजमान होण्यापूर्वी जयंत सिन्हा हे ओमिड्यार कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर होते. ओमिड्यार आणि माझ्यात जे व्यवहार झाले ते कायदेशीर होते, असा दावा त्यांनी ट्विटरवर केला. जयंत सिन्हा यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आणि खासदार झाल्यावर लोकसभा सचिवालयाला याबाबत माहिती दिली नाही. मात्र पंतप्रधान कार्यालयाला 2016 मध्ये दिलेल्या माहितीत याबाबत मोघम उल्लेख होता.

नवी दिल्ली - पॅराडाइज पेपर्समध्ये नाव आल्याने  अडचणीत आलेले केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्रिपदावर येण्यापूर्वीच आपण कंपनीतील पदाचा राजीनामा दिला होता असं जयंत सिन्हा म्हणाले आहेत. 
पॅराडाइज पेपर्स प्रकरणात नाव आल्यानंतर जयंत सिन्हा यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. पॅराडाइज पेपर्स प्रकरणात मी ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रात मी माझी बाजू मांडली आहे. मी मंत्रिपदावर विराजमान होण्यापूर्वीच या कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला होता. असे त्यांनी सांगितले. 
मोदी सरकारमध्ये मंत्रिपदी विराजमान होण्यापूर्वी जयंत सिन्हा हे ओमिड्यार कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर होते. ओमिड्यार आणि माझ्यात जे व्यवहार झाले ते कायदेशीर होते, असा दावा त्यांनी ट्विटरवर केला. मी ओमिड्यार कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी होतो. यानंतर ‘ओमिड्यार’ने गुंतवणूक केलेल्या डी. लाईट या कंपनीत मी स्वतंत्र संचालकपदी होतो. मात्र मंत्रिपदी विराजमान होताच मी कंपनीतील पदाचा राजीनामा दिला होता, असे स्पष्टीकरण सिन्हा यांनी दिले आहे.
ओमिड्यारने अमेरिकेतील डी. लाईट या कंपनीत गुंतवणूक केली होती. डी.लाईट कंपनीची एक शाखा कॅरेबियन बेटांमधील कॅमेन येथे होती. ‘अॅपलबाय’च्या कागदपत्रांवरुन हा खुलासा झाला आहे.  
जयंत सिन्हा यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आणि खासदार झाल्यावर लोकसभा सचिवालयाला याबाबत माहिती दिली नाही. मात्र पंतप्रधान कार्यालयाला 2016 मध्ये दिलेल्या माहितीत याबाबत मोघम उल्लेख होता.














पॅराडाइज पेपर्स प्रकरण -
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 96 नामांकित माध्यम समूहांनी मिळून 'पॅराडाइज पेपर्स'चा खुलासा करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पॅराडाइज पेपर्समध्ये 1.34 कोटी दस्तऐवजांचा समावेश आहे. या खुलाशाद्वारे बनावट कंपन्यांबद्दल माहिती समोर आली आहे, ज्याद्वारे जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली मंडळी आपला पैसा परदेशात पाठवण्यासाठी वापर करत होते.  'पॅराडाइज पेपर्स'मध्ये भारतातील 714 जणांचा समावेश आहे.  पॅराडाइज पेपर्स लीकमध्ये पनामाप्रमाणे कित्येक भारतीय राजकीय नेते, अभिनेते आणि व्यावसायिकांच्याही नावाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 
तर, यादीमध्ये जगभरातील एकूण 180 देशांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये भारत 19व्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. बर्म्युडामधील 'अॅपलबाय' या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची सर्वाधिक कागदपत्रं उघड करण्यात आली आहेत. 
 जागतिक पातळीवर अमेरिकेतील  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील उद्योग मंत्रालयाचे सचिव विलबर रॉस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांच्यासाठी निधी संकलन करणाऱ्यांचे नावही या यादीत आहे. याशिवाय ट्विटर आणि फेसबुकमध्ये रशियातील कंपन्यांची गुंतवणूक केल्याचा उल्लेखही या पेपर्समध्ये आहे.
या भारतीयांच्या नावाचा आहे समावेश-
नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, विजय माल्या, नीरा राडिया, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्यासारख्या ख्यातनाम मंडळींचा यात समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचे बर्म्युडामधील एका कंपनीत समभाग असल्याचा धक्कादायक खुलासाही झाला आहे.

 

Web Title: Explanation of Jayant Sinha's resignation as Parrikar's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.