जम्मू विमानतळ परिसरात मध्यरात्री मोठा स्फोट; परिसरात एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 08:17 AM2021-06-27T08:17:49+5:302021-06-27T08:18:58+5:30
हवाईदल, लष्कर, पोलीस दलातील अधिकारी घटनास्थळी दाखल
जम्मू: जम्मू विमानतळाच्या तांत्रिक परिसरात रात्री उशिरा स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. बॉम्ब निकामी करणारं पथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. रात्री २ च्या सुमारास जम्मू विमानतळ परिसरात स्फोटाचा आवाज ऐकू आला. स्फोटाचा आवाज बऱ्याच अंतरापर्यंत ऐकू गेला.
Jammu and Kashmir: Explosion heard inside Jammu airport's technical area; forensic team reaches the spot
— ANI (@ANI) June 27, 2021
Details awaited pic.twitter.com/duWctZvCNx
हवाईदल, लष्कर, पोलीस दलातील अधिकारी घटनास्थळी
स्फोट झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर जम्मूतील मुख्य विमानतळ आणि भारतीय हवाई दलाचं स्टेशन हेडक्वॉर्टर आहे. त्यामुळे हा भाग संवेदनशील समजला जातो. रात्री उशिरा स्फोट होताच आसपासच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. सध्याच्या घडीला घटनास्थळी हवाई दल, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील अधिकारी उपस्थित आहेत.
One terrorist arrested from the Narwal area, 5 kg IED recovered; Investigation underway: Jammu and Kashmir Police
— ANI (@ANI) June 27, 2021
जम्मूतून एक दहशतवादी अटकेत
जम्मू विमानतळ परिसरात स्फोट झाल्याची घटना घडली असताना जम्मूतीलच त्रिकुटा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या वेव मॉलजवळ एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याचं नाव नदिम असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचं वय २० वर्षे असून त्याच्याजवळ ५ किलो आईडी सापडलं आहे. या दहशतवाद्याचा जम्मू विमानतळाच्या घटनेशी काही संबंध आहे का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.