यूपी विधानसभेत आढळली स्फोटकं; NIA चौकशीची योगींची मागणी
By Admin | Published: July 14, 2017 12:51 PM2017-07-14T12:51:41+5:302017-07-14T12:58:31+5:30
विधानसभेत स्फोटकं आढळल्याच्या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 14- उत्तर प्रदेशमधील विधानसभेत स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. विधानसभेत सापडलेली स्फोटकं हा दहशतवादी हल्ल्याचा कट असून त्याबद्दलची खरी माहिती हे समोर आलीच असं योगी आदित्यनाथ यांनी म्हंटलं आहे. शुक्रवारी विधान सभेच्या अधिवेशनात योगी आदित्यनाथ यांनी ही मागणी केली आहे.
विधानसभेच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था असताना स्फोटकं सदनात कशी आली? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. शुक्रवारी विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टीकरण दिलं. बुधवारी विरोधी पक्षाच्या आमदाराच्या आसनाखाली स्फोटक पदार्थ सापडले होते. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात या स्फोटक पदार्थाचे नाव पीइटीएन (PETN) असल्याचं निष्पन्न झालं. १५० ग्रॅम पीईटीएन सापडलं असून संपूर्ण विधानसभा स्फोटात उडवण्यासाठी ५०० ग्रॅम पीईटीएनची गरज असते. विधानसभेत स्फोटक पदार्थ सापडणं हा गंभीर प्रकार आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. एनआयएमार्फतच याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आणखी वाचा
LOVE मध्ये या तरुणाने केला जिहाद
आळशी देशांच्या यादीत भारताचा नंबरडोकलाम प्रकरण - अजित डोवाल जाणार चीनला
विधानसभेच्या सुरक्षेत त्रुटी असून विधानसभेत नेमलेल्या प्रत्येक सुरक्षा कर्मचाऱ्याची पोलीस पडताळणी झाली पाहिजे. सुरक्षेसाठी नव्याने नियमावली तयार करण्याची गरज असल्याचं योगी म्हणाले आहेत. तसंच सुरक्षेची पडताळणी होत असताना आमदारांनी त्यासाठी सहकार्य करावं, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभेत सत्र चालू असताना स्फोटकं आढळल्याची घटना गुरूवारी घडली होती. यामुळे विधानसभेत एकच
खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. विधानसभेत विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीपासून काही अंतरावर ही पांढऱ्या रंगाची पावडर सापडल. 150 ग्रॅम वजन असणाऱ्या पावडरला तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आलं होतं. गुरूवारी संध्याकाळी फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टने ही पावडर पीईटीएन नावाचं स्फोटक असल्याचा खुलासा केला.