भारतातून १९४ देशांमध्ये कृषिमालाची निर्यात; बांगलादेशात ३ वर्षांत १३ पट वाढ

By नामदेव मोरे | Published: July 15, 2022 07:24 AM2022-07-15T07:24:43+5:302022-07-15T07:25:25+5:30

यूएईसह आखाती देशांचीही मागणी वाढली.

Export of agricultural commodities from India to 194 countries 13 times growth in 3 years in Bangladesh uae us saudi | भारतातून १९४ देशांमध्ये कृषिमालाची निर्यात; बांगलादेशात ३ वर्षांत १३ पट वाढ

भारतातून १९४ देशांमध्ये कृषिमालाची निर्यात; बांगलादेशात ३ वर्षांत १३ पट वाढ

Next

नामदेव मोरे
भारतामधून कृषिमालाची निर्यात वाढू लागली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल १९४ देशांमध्ये विविध वस्तूंची निर्यात केली आहे. सर्वाधिक निर्यात बांगलादेशात होत असून तीन वर्षांत त्यामध्ये १३ पट वाढ झाली आहे. यूएईचा दुसरा क्रमांक असून सर्वच आखाती देशांमधून भारतीयशेतीमालाला मागणी वाढू लागली आहे. 

शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा व कृषी व्यापारातून विदेशी मुद्रा प्राप्त व्हावी यासाठी सरकारीस्तरावर कृषिमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन दिले जात आहे. अपेडा, पणन मंडळ या संस्थांच्या माध्यमातून निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्यामुळे मागील काही वर्षांत  निर्यातीचे आकडे वाढू लागले आहेत.

२०२०-२१ मध्ये देशातून ३ कोटी ६ लाख टन मालाची निर्यात होऊन १ लाख ५० हजार ९४६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. २०२१-२२ मध्ये ४ कोटी ९ लाख ४३९६० टन मालाची निर्यात झाली असून तब्बल १ लाख ८३ हजार २२९ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

२०२०-२१ मधील प्रमुख देशांमधील निर्यात
देश            निर्यात माल     उलाढाल 
                    (टन)              (कोटी)
बांगलादेश    ८४०५०५७    २११५४
यूएई             १८९१४७१    १२०६३
यूएसए               ६२२१९९    ९२३३
व्हिएतनाम    २१६९३०९    ९१०९
सौदी अरब    १०६६१९१    ८३४९
नेपाळ           ३२७५०४९    ८०७७
मलेशिया       ११६९३५१    ७७३९
इराण             १२१३९४४    ७१९१
इंडोनेशिया    १०९०२६५    ७१८०
इजिप्त            ३६६५५५    ६०७१

Web Title: Export of agricultural commodities from India to 194 countries 13 times growth in 3 years in Bangladesh uae us saudi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.