पॅन कार्ड क्रमांक आधारसोबत लिंक करण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:17 AM2019-09-29T11:17:11+5:302019-09-29T11:19:36+5:30

नागरिकांच्या प्रत्येक कागदपत्र आधार कार्डशी जोडण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. अर्थ मंत्रालयाकडून आधार आणि पॅन कार्ड जोडण्यासाठी 30 सप्टेंबर मुदत देण्यात आली होती.

Extend Pan-Aadhaar linking | पॅन कार्ड क्रमांक आधारसोबत लिंक करण्यास मुदतवाढ

पॅन कार्ड क्रमांक आधारसोबत लिंक करण्यास मुदतवाढ

googlenewsNext

मुंबई: नागरिकांच्या प्रत्येक कागदपत्र आधार कार्डशी जोडण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. अर्थ मंत्रालयाकडून आधार आणि पॅन कार्ड जोडण्यासाठी 30 सप्टेंबर मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत वाढविण्याचा निर्णय सरकाने घेतला आहे. त्यामुळे एखाद्याला कोणत्याही कारणास्तव पॅनशी आधार जोडणे शक्य झाले नसेल तर आता जोडता येणार आहे. 

पॅन कार्ड क्रमांक आधारसोबत लिंक करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. मात्र केंद्रीय अर्थमंत्रालयाने पुन्हा एकदा मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पॅन कार्ड-आधार लिंक करता येणार आहे. सीबीटीडीकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनातून ही माहिती देण्यात आली.

आयकर विभागाने पॅनशी आधार जोडणे बंधनकारक केले आहे. तसेच 31 डिसेंबरपर्यंत न जोडल्यास आपले पॅनकार्ड 1 जानेवारी 2020 पासून निष्क्रिय करण्यात येणार आहे. पॅन आणि आधार क्रमांक आयकर विभागाच्या संकेतस्थळावरुन किंवा एसएमएसच्या सहाय्याने लिंक करता येणार आहे. मात्र, हे क्रमांक जोडताना नाव आणि जन्मतारीख चुकीची असणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

Web Title: Extend Pan-Aadhaar linking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.