आधार लिंकिंगला मुदतवाढ देणार, केंद्राची तयारी; सर्वोच्च न्यायालयात तूर्तास सुनावणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:30 AM2017-11-28T01:30:12+5:302017-11-28T01:30:25+5:30

विविध योजनांसाठी आधारला लिकिंग करण्यासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०१८ करण्यासाठी इच्छुक असल्याचे केंद्र सरकारनर्फे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले.

 The extension of support linking, preparation of the center; There is no hearing in the Supreme Court hastily | आधार लिंकिंगला मुदतवाढ देणार, केंद्राची तयारी; सर्वोच्च न्यायालयात तूर्तास सुनावणी नाही

आधार लिंकिंगला मुदतवाढ देणार, केंद्राची तयारी; सर्वोच्च न्यायालयात तूर्तास सुनावणी नाही

Next

नवी दिल्ली : विविध योजनांसाठी आधारला लिकिंग करण्यासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०१८ करण्यासाठी इच्छुक असल्याचे केंद्र सरकारनर्फे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले.
न्या. दीपक गुप्ता यांच्या पीठाने स्पष्ट केले की, घटनापीठाकडून दिल्ली-केंद्र वादावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आधार लिकिंगला आव्हान देणाºया याचिकांवर सुनावणी करण्यात येईल.
न्या. गुप्ता न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पीठाने सांगितले की, घटनापीठ एक अंतरिम आदेश जारी करेल. आधार लिकिंगच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीसाठी अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.
सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील एका पीठाने ३० आॅक्टोेबर रोजी सांगितले होते की, आधार संबंधी प्रकरणांची सुनावणी एका घटनापीठापुढे होईल.
सध्या आधार बँक खात्याशी जोडण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१७ आहे. तर, आधार मोबाईल नंबरला जोडण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०१८ आहे.

Web Title:  The extension of support linking, preparation of the center; There is no hearing in the Supreme Court hastily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.