आयटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ; करदात्यांना १० जानेवारीपर्यंत विवरणपत्र दाखल करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 11:52 PM2020-12-30T23:52:56+5:302020-12-30T23:53:10+5:30
वैयक्तिक करदात्यांना ३१ डिसेंबरपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती.
नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र (आयटी रिटर्न) भरण्याची मुदत केंद्र सरकारने वाढवली आहे. आता करदात्यांना १० जानेवारीपर्यंत विवरणपत्र दाखल करता येणार आहे. विवरणपत्र दाखल करण्याची मुदत केंद्र सरकारने तिसऱ्यांदा वाढवली आहे. यापूर्वी ३१ जुलै व ३१ डिसेंबर अशी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती.
वैयक्तिक करदात्यांना ३१ डिसेंबरपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. २८ डिसेंबरपर्यंत साडेचार कोटी लोकांनी विवरणपत्र दाखल केले होते. मात्र, अनेकांना विवरणपत्र दाखल करता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर १० जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. व्यापारी तसेच कंपन्यांना त्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करून घेणे अनिवार्य आहे त्यांनाही १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. वस्तू व सेवा कर विवरणपत्र (जीएसटी रिटर्न) भरण्याची मुदतही केंद्र सरकारने २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत ३१ डिसेंबर होती.