भारतीय खाद्य उद्योगात व्यापक क्षमता
By admin | Published: March 3, 2017 04:32 AM2017-03-03T04:32:36+5:302017-03-03T04:32:36+5:30
भारताची आरोग्यदायी खाद्य परंपरा वैविध्यपूर्ण असून भारतीय खाद्य उत्पादनांत व्यापक आर्थिक क्षमता आहेत,
नवी दिल्ली : भारताची आरोग्यदायी खाद्य परंपरा वैविध्यपूर्ण असून भारतीय खाद्य उत्पादनांत व्यापक आर्थिक क्षमता आहेत, असे प्रतिपादन निति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी केले. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्याची शक्यता असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी तयार होतील, असेही कांत म्हणाले.
कांत यांनी म्हटले की, भारताच्या किरकोळ आणि खाद्य क्षेत्रात व्यापक क्षमता आहेत. सध्या २५0 अब्ज डॉलरवर असलेला हा उद्योग २0१९-२0पर्यंत ४८२ अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे.
अमिताभ कांत यांनी पुढे सांगितले की, या क्षेत्राकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचीही व्यापक क्षमता आहे. त्यातून रोजगारांच्या भरपूर संधी निर्माण होतील. अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, येत्या चार ते पाच वर्षांत आम्ही एक कोटीपेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण करू शकतो. त्यातून खाद्य उद्योगास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल. अर्थव्यवस्थेसाठी ही बाब पोषक ठरेल.
कांत म्हणाले की, भारताची प्रशंसा करण्यास भारताच्या खाद्यापेक्षा दुसरा चांगला प्रकार होऊच शकत नाही. जैविक शेतीकडे लक्ष देऊन भारत आपले स्वत:चे ब्रँड मूल्य तयार करू शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>सिक्किम जैविक राज्य घोषित
राजधानी दिल्लीत झालेल्या एका परिसंवादात बोलताना कांत यांनी गेल्या वर्षी सिक्किम सरकारला १00 टक्के जैविक राज्य घोषित केले.त्यांनी यासंदर्भात म्हटले की, माझे असे मत आहे की, भारताने जैविक शेतीकडे अधिक लक्ष दिल्यास भारताचा स्वत:चा ब्रँड तयार होऊ शकतो.अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, येत्या चार ते पाच वर्षांत आम्ही एक कोटीपेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण करू शकतो.