उद्दीष्टापेक्षा मिळवला जास्तीचा महसूल राज्य उत्पादन शुल्क : विभागात जळगाव जिल्‘ाची कामगिरी सरस

By admin | Published: April 2, 2016 11:50 PM2016-04-02T23:50:44+5:302016-04-02T23:50:44+5:30

जळगाव: राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात १५ कोटी ५५ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळवून दिला आहे. शासनानेे जिल्‘ाला १३ कोटी २५ लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट पार करत विभागाने दोन कोटी ३० लाखांचा अतिरक्त महसूल मिळवून दिला आहे. मद्यनिर्मितीचा जिल्‘ात एकही कारखाना नसतानाही जिल्‘ाची कामगिरी विभागात सरस ठरली आहे.

Extra revenue beyond the target State Excise duty: Jalgaon district performance in the division | उद्दीष्टापेक्षा मिळवला जास्तीचा महसूल राज्य उत्पादन शुल्क : विभागात जळगाव जिल्‘ाची कामगिरी सरस

उद्दीष्टापेक्षा मिळवला जास्तीचा महसूल राज्य उत्पादन शुल्क : विभागात जळगाव जिल्‘ाची कामगिरी सरस

Next
गाव: राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात १५ कोटी ५५ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळवून दिला आहे. शासनानेे जिल्‘ाला १३ कोटी २५ लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट पार करत विभागाने दोन कोटी ३० लाखांचा अतिरक्त महसूल मिळवून दिला आहे. मद्यनिर्मितीचा जिल्‘ात एकही कारखाना नसतानाही जिल्‘ाची कामगिरी विभागात सरस ठरली आहे.
आयुक्त विजय सिंघल व विभागाचे उपायुक्त पी.पी.सुर्वे यांच्या आदेशाने वर्षभर भरारी पथकामार्फत अथवा विशेष मोहीम राबवून केलेल्या कारवाईत पकडण्यात आलेल्या मुद्देमालाची आकडेवारी आणखी वेगळी आहे. दरम्यान, जिल्‘ात मद्यविक्रीचे ७९९ दुकाने व बार आहेत. फेबु्रवारीअखेर ५ कोटी ७९ लाखाचा महसूल प्राप्त झाला होता दर १४ लाख रुपये दंडाच्या स्वरुपात प्राप्त झाले आहेत. ५६८ परवान्याचे एक वर्षासाठी नूतनीकरण करण्यात आले त्यातून ६ कोटी ५१ लाख ९२ हजार १७८ रुपयांचा तर ९२ परवान्याचे पाच वर्षासाठी नुतनीकरण करण्यात आले, त्यातून एक कोटी ८० लाख २५ लाख ८०० रुपयांचा असा नूतनीकरणातून आठ कोटी ४१ लाख ७ हजार ९७८ रुपया महसूल प्राप्त झाला आहे. १ कोटी २१ लाख रुपये नुतनीकरणाव्यतिरिक्त मिळाले आहेत.

कोट...
राज्य शासनाने निर्धारित केलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्तचा महसूल मिळविण्यात आम्हाला यश आले आहे. ११७ टक्के महसूल मिळाला आहे. मद्यविक्री व परवाना नुतनीकरणाच्या माध्यमातून हा महसूल प्राप्त झाला आहे.आयुक्त विजय सिंघल व उपायुक्त पी.पी.सुर्वे यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांमुळे कामाचा वेग अधिक वाढला.
-एस.एल.आढाव, अधीक्षक

असे आहेत जिल्‘ात मद्यविक्रीचे दुकाने
विदेशी ठोक विक्री : ७
विदेशी किरकोळ विक्री :३८ (सीलबंद)
विदेशी किरकोळ विक्री : ३५२ (लूज)
देशी किरकोळ विक्री : ३७ (सीलबंद)
बियर किरकोळ विक्री १५६ (सीलबंद)
देशी ठोक विक्री : ९
देशी किरकोळ विक्री : १५६ (लूज)
बियर किरकोळ विक्री :४४

असे रिचवले मद्य (लीटरमध्ये)
देशी : ९९ लाख ३६ हजार ३०८
विदेशी : ३७ लाख १३ हजार ५३९
बियर : ५३ लाख ८९ हजार ६२२
वाईन : ४२ हजार ५५०
(१ एप्रिल २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१५ ची आकडेवारी)

Web Title: Extra revenue beyond the target State Excise duty: Jalgaon district performance in the division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.