टोल प्लाझावर FASTag मधून अतिरिक्त 10 रुपये कापले, गाडी मालकाला मिळाली 8000 रुपयांची भरपाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 04:48 PM2023-05-11T16:48:49+5:302023-05-11T16:49:35+5:30

गाडी मालकाने याप्रकरणी NHAI ला कोर्टात खेचले, अखेर कोर्टाने न्याय केला.

Extra Rs 10 deducted from FASTag at toll plaza, car owner gets compensation of Rs 8000 | टोल प्लाझावर FASTag मधून अतिरिक्त 10 रुपये कापले, गाडी मालकाला मिळाली 8000 रुपयांची भरपाई...

टोल प्लाझावर FASTag मधून अतिरिक्त 10 रुपये कापले, गाडी मालकाला मिळाली 8000 रुपयांची भरपाई...

googlenewsNext


देशात एक्सप्रेस-वे आणि हायवेचे जाळे वेगाने विस्तारत आहे. लोकांना सुखकर प्रवास मिळाला, तसेच योग्य टोल टॅक्स वसूल व्हावा यासाठी या महामार्गांवर टोलनाके बांधण्यात येतात. पण बंगळुरुमधील टोल प्लाझावर जादा पैसे कापणे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ला महागात पडले. बंगळुरुतील एका व्यक्तीने टोलवर अतिरिक्त पैसे कापल्याबद्दल NHAI ला ग्राहक न्यायालयात खेचले. यानंतर न्यायालयाने फक्त 10 रुपये अतिरिक्त पैसे कापल्याबद्दल प्राधिकरणाला भरीव भरपाई देण्याचे आदेश दिले. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगळुरू येथील रहिवासी संतोष कुमार एमबी यांनी 2020 मध्ये चित्रदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गावर गाडी चालवत होते, यावेळी त्यांच्या फास्टॅग खात्यातून 5 रुपये अतिरिक्त कापले गेले, म्हणजेच दोन्ही वेळेस 10 रुपये कापले गेले. संतोषच्या म्हणण्यानुसार, टोल प्लाझा ओलांडण्यासाठी त्यांच्या FASTag खात्यातून 35 रुपये कापले जायला हवे होते, परंतु 40 रुपये कापले गेले. म्हणजे त्यांच्याकडून एकूण 10 रुपये जादा घेण्यात आले. 10 रुपये ही मोठी रक्कम नसली तरी एका महिन्यात लाखो वाहने टोल प्लाझा ओलांडतात, त्यामुळे ही अतिरिक्त कपात एखाद्या मोठ्या घोटाळ्यापेक्षा कमी नव्हती.

अधिकाऱ्यांनी ऐकले नाही
कुमार यांनी याप्रकरणी नगर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. एवढेच नाही तर त्यांनी या संदर्भात प्रकल्प संचालक व प्रकल्प अंमलबजावणी युनिट, चित्रदुर्ग यांच्याशीही संपर्क साधला, मात्र यश मिळाले नाही. अधिकाऱ्यांच्या डेस्कवर जावून थकलेल्या संतोषने शेवटी न्यायव्यवस्थेवर विश्वास दाखवला आणि NHAI ला कोर्टात खेचले. त्यांनी प्रथम अतिरिक्त जिल्हा ग्राहक वाद निवारण चित्रदुर्ग येथील NHAI प्रकल्प संचालक आणि नागपूर येथील जेएएस टोल रोड कंपनी लिमिटेडच्या व्यवस्थापकावर खटला दाखल केला. त्यानंतर NHAI च्या प्रोजेक्ट डायरेक्टरच्या वतीने एक वकील हजर झाला आणि असा युक्तिवाद केला की FAStag सिस्टीम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिझाइन, विकसित आणि कॉन्फिगर केली आहे.

ग्राहक न्यायालयात विजय:
वकिलाने न्यायलयात युक्तिवाद केला, परंतु प्राधिकरणाच्या वकिलांचे सर्व दावे आणि युक्तिवादांना न जुमानता ग्राहक न्यायालयाने एजन्सीला संतोषकुमार यांना अतिरिक्त टोल शुल्क परत करण्याचे आणि त्यांना 8,000 रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. अशाप्रकारे 10 रुपयांऐवजी 8000 रुपयांची भरपाई संतोष कुमारला मिळाली. 

Web Title: Extra Rs 10 deducted from FASTag at toll plaza, car owner gets compensation of Rs 8000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.