उबरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी

By admin | Published: June 8, 2017 02:03 PM2017-06-08T14:03:30+5:302017-06-08T14:46:10+5:30

अमेरिकन कॅब कंपनी उबरच्या आशिया विभागाचे प्रमुख एरिक अलेक्झांडर यांची कामावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Extrusion of senior officers of the bureaucracy | उबरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी

उबरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 8- अमेरिकन कॅब कंपनी उबरच्या आशिया विभागाचे प्रमुख एरिक अलेक्झांडर यांची कामावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. एरिक यांच्यावर बलात्कार पीडित महिलेची गोपनिय माहिती उघड करण्याचा आणि त्या महिलेचे मेडिकल रेकॉर्ड इतरासह शेअर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. उबरने गेल्या काही दिवसात 20 मोठ्या कर्मचाऱ्यांना अयोग्य व्यवहार आणि वागणुक केल्यामुळे घरचा रस्ता दाखविला आहे. त्याचप्रमाणे एरिक यांनाही घरी पाठविण्यात आलं आहे. 
 
उबरच्या आशिया पॅसिफिक प्रमुख एरिक अलेक्झांडर यांच्याकडे त्या पीडित महिलेचे मेडिकल रेकॉर्ड होते. ती माहिती त्यांनी उबरचे सीईओ ट्रॅविस कलानीक आणि एसवीपी अॅमिल मायकल यांच्याकडे दिली होती. इतकंच नाही, तर पत्रकारांमध्येसुद्धा त्यांनी त्या महिलेबद्दलची  माहिती उघड केली होती. एरिक यांच्या या कृत्यामुळे बलात्कार पीडित महिलेची गोपनीयता भंग झाली आहे. या कारणामुळे कंपनीने ही कारवाई केली आहे.
 
दिल्लीत घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर एरिकअलेक्झांडर हे ट्रॅविस कलानीक आणि अॅमिल मायकलसह या घटनेच्या तपासणीसाठी भारतात आले होते. त्यावेळी ओला-उबरचं  नाव खराब करण्यासाठी हे सगळं केलं जातं आहे, असा आरोप त्यांनी केला होता. म्हणूनच या घटनेची मूळापासून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली होती. या दरम्यानच एरिक यांना पीडित महिलेचे मेडिकल रेकॉर्ड सापडले होते.   
 
न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एरिक अलेक्झांडर यांना दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी भारतात बोलवलं होतं. त्यावेळी उबर फक्त 20 टक्के कमीशन घेतं. अनेक ठिकाणी चालकाला योग्य पडताळणी करून कामावर घेतलं जातं, तसंच जीपीएसच्या माध्यमातून कंपनी 24 तास चालकांवर लक्ष ठेवून असते, असं त्यांनी चौकशी दरम्यान सांगितलं होतं. 
6 डिसेंबर 2014 रोजी झालेल्या बलात्काराच्या या घटनेत दोषी कॅब ड्रायव्हर शिवकुमार  यादव याला जन्मठेपेची शिक्षा सुनविण्यात आली आहे. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेने उबर कॅब बूक केल्यानंतर ही घटना घडली होती.
 

Web Title: Extrusion of senior officers of the bureaucracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.