चष्म्याला बाय बाय करण्याचा दावा करणाऱ्या 'आय- ड्रॉप'वर दोनच दिवसांत बंदी; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 07:37 PM2024-09-11T19:37:14+5:302024-09-11T19:38:00+5:30

ड्रग रेग्युलेटर, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारतातील पहिल्या 'आय-ड्रॉप'ला मान्यता दिली होती, यावर CDSCO ने बंदी घातली आहे.

eye drop presvu which claims to remove eyeglasses banned | चष्म्याला बाय बाय करण्याचा दावा करणाऱ्या 'आय- ड्रॉप'वर दोनच दिवसांत बंदी; कारण काय?

चष्म्याला बाय बाय करण्याचा दावा करणाऱ्या 'आय- ड्रॉप'वर दोनच दिवसांत बंदी; कारण काय?

डोळ्यांच्या काचबिंदूसाठी वापरल्या जाणाऱ्या पिलोकार्पिन या औषधाची तीव्रता कमी करून एका खासगी कंपनीने नवीन औषध बाजारात आणले आहे. या औषधाच्या वापरामुळे जवळचे वाचण्यासाठी चष्म्याची गरज भासणार नाही, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला होता आहे. मात्र, काहीच दिवसात या कंपनीच्या औषधावर CDSCO ने बंदी घातली आहे.

या आय ड्रॉप्सच्या वापराने वाचण्यासाठी चष्मा लावण्याची गरज नसल्याचा दावा केला होता. भारताच्या औषध नियामक एजन्सीनेही त्यास मान्यता दिली होती, पण आता सीडीएससीओने पुढील सूचना येईपर्यंत मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया बरा करण्याचा दावा करणाऱ्या या 'आय ड्रॉप'वर बंदी घातली आहे. 

वेळीच डोळे उघडा!... 'त्या' ड्रॉप्समुळे सरसकट सगळ्यांचा 'जवळचा चष्मा' जाणार नाही

मायोपिया आणि हायपरमेट्रोपियाच्या उपचारांसाठी प्रेसव्हू नावाचे 'आय ड्रॉप्स' विकसित केले आहेत. या औषधाच्या नियमित वापराने वाचण्यासाठी चष्मा लावण्याची गरज नसल्याचा दावा कंपनीने केला होता.  सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या विषय तज्ञ समितीने उत्पादनाची शिफारस केल्यानंतर ENTOD फार्मास्युटिकल्सला भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल (DCGI) कडून अंतिम मान्यता देखील मिळाली. पण फार्मास्युटिकल कंपनीने या 'आय ड्रॉप' प्रेस्वूच्या अनधिकृत जाहिरातीचा गंभीर विचार करून, नियामकाने पुढील आदेशापर्यंत त्यांना बंदी घातली आहे.

बंदी का घातली?


दोन दिवसापूर्वी या औषधाची बातमी समोर आली होती. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामुळे चष्मा वापरणाऱ्या लाखो लोकांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे या 'आय ड्रॉप'च्या असुरक्षित वापराबाबत आणि जनतेच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाल्या.  कारण या औषधाला फक्त प्रिस्क्रिप्शन औषध म्हणून मंजुरी दिली आहे, म्हणजेच हे औषध फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरता येत होते. पण, प्रत्येकजण चष्माची कटकट घालवण्यासाठी या औषधाचा वापर करु शकतो अशी जाहीरात कंपनीने केली. प्रिस्क्रिप्शनवर आधारित 'आय ड्रॉप्स' ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून फार्मसीमध्ये ३५० रुपये किमतीत उपलब्ध होणार होते.

कंपनीचा दावा काय होता?

'कंपनीने या औषधाच्या पेटंटसाठी अर्ज केलाय. फक्त चष्मा काढण्यावरच उपचार नाही तर डोळ्यांच्या लूब्रिकेशनचेही काम करते. या ड्रॉप्समध्ये अॅडव्हान्स डायनॅमिक तंत्रज्ञानाचाही वापर केला. हे ड्रॉप दिर्घकालीन वापरु शकता, तसेच आय ड्रॉप्स वापरल्यानंतर १५ मिनिटांत या परिणाम दिसायला लागेल, असा दावा कंपनीने केला होता.

Web Title: eye drop presvu which claims to remove eyeglasses banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.