बिलोली पालिका सीसीटीव्हीच्या नजरेत
By admin | Published: June 25, 2015 11:51 PM2015-06-25T23:51:12+5:302015-06-25T23:51:12+5:30
सव्वाकोटींच्या कामांचा २६ ला निर्णय
Next
स ्वाकोटींच्या कामांचा २६ ला निर्णयबिलोली : येथील नगरपालिका पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरेत आली आहे़ सभागृह, कर्मचारी कक्ष, मुख्याधिकारी कक्ष आणि कम्पाऊंड परिसात कॅमेरे बसवण्यात आले आहेत़ परिणामी अधिकारी व कर्मचार्यांशी अनावश्यक हुज्जत घालणार्यांवर लगाम बसणार आहे़ दरम्यान २६ जून रोजी सव्वाकोटींच्या विकासकामांसह अन्य १५ विषयांवर पालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे़येथील नगरपालिका या ना त्या कारणामुळे चर्चेत राहत आली आहे़ विकासकामांच्या बाबतीत तर नेहमीच घोळचघोळ होत आलेला आहे़ दीड वर्षापूर्वी कामे न करताच उचललेल्या ५० लाखांचे प्रकरण जिल्ात गाजले़ तत्पूर्वी निविदा कुठे ठेवल्या यावरूनही वादंग झाले होते़ तर कर्मचार्यांकडून कामाची संचिकाच हिसकावून गायब केल्याचा प्रकार झाला़ फाईल गहाळ प्रकरणामुळे पोलिसात गुन्हा दाखल झाला़ सध्या सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे़ पालिका सभागृह, परिसर, कर्मचार्यांच्या वेगवेगळ्या कक्षात होणारा प्रकार पाहता आता संपूर्ण कार्यालय आणि परिसर सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्यात आला़ महिनाभरापूर्वी एका नगरसेवकाचा व मुख्याधिकार्यांत तू-तू-मै-मै व अरेरावीच्या भाषेचा प्रकार घडला़ परिणामी अधिकार्यांसह कर्मचार्यात दहशतीचे वातावरण झाले़ बर्याचवेळा महिला नगरसेविकांचेच प्रतिनिधी हस्तक्षेप करतात आणि अधिकारी कर्मचा्रयांना नाकीनऊ आणतात़ अशा कॅमेरामुळे सर्वच प्रकारावर ब्रेक बसला आहे़ कार्यालयीन कामकाजाच्या वेळातील सर्व रेकॉर्डींग केले जात आहे़ अशा रेकॉडींगमुळे सबळ पुरावे समोर येतील व वास्तव काय आहे हे सर्वांनाच कळेल़ पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रस्तावित रकमेच्या कमी दराने निविदा आलेल्या आहेत़ शहरातील सव्वा कोटींच्या कामाच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या़ यापूर्वी याच निविदा ठेकेदारांच्या अंतर्गत भांडणामुळे आणि वाढीव दराने असल्याने स्थायी निर्देश ३६ चे उल्लंघन झाल्याचे सांगून रद्द करण्यात आल्या़ आता हीच कामे पुन्हा वेगवेगळ्या ठेकेदारांनी स्पर्धात्मक निविदेच्या माध्यमातून सादर केली असून प्रस्थापित रकमेच्या १५ ते २२ टक्क्यापर्यंत (बिलो) कमी दराने आहेत़ विकास कामाअंतर्गत कोळी समाज स्मशानभूमीच्या महत्त्वाचा कामाचा भाग आहे़ २६ जून रोजी या प्रमुख विषयांसह अन्य १५ विषयावर सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली़ पालिकेची सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच ईन कॅमेरा होणार आहे़