बिहारमध्ये स्वच्छता अभियानाच्या प्रचारासाठी पाकिस्तानी मुलीचा फोटो, आता होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 08:08 PM2018-05-05T20:08:53+5:302018-05-05T20:08:53+5:30
सरकारी अभियानांना चालना देण्यासाठी बिहारमधील एका पुस्तकावर छापलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरतो आहे.
जमुई- उत्तर प्रदेशच्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठात मोहम्मद अली जिनाच्या फोटोवरून वाद सुरू झालेला असतानाच आता भारताच्या सरकारी अभियानांना चालना देण्यासाठी बिहारमधील एका पुस्तकावर छापलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरतो आहे. बिहारच्या जमुई जिल्ह्यातील स्वच्छता अभियानाच्या पुस्तकावर एका पाकिस्तानी मुलीचा फोटो छापल्याचा आरोप केला जातो आहे. दरम्यान, या प्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Photo of Pakistani girl used on notebook of 'Clean Jamui, Healthy Jamui' campaign, girl is seen painting Pakistan's flag in the photo. Notebook has been distributed in all schools in the area. District Coordinator of sanitation & water Sudhir Kumar says, 'it was a mistake' #Biharpic.twitter.com/oicZnSBL0N
— ANI (@ANI) May 5, 2018
ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून पाकिस्तानी मुलाचा फोटो छापल्यामुळे पुन्हा एकदा वाद सुरू होण्याची चिन्हं आहेत. जमुईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. जमुई जिल्हा कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जमुई जिल्ह्यात स्वच्छतेसाठीचा संदेश देण्यासाठी 'स्वच्छ जमुई, स्वस्थ जमुई' अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर वाद सुरू झाला आहे. जमुईच्या जिल्हा तसंच स्वच्छता समितीने पुस्तक छापायची जबाबदारी पाटण्याच्या एका प्रिंटिंग प्रेसला दिली होती.
दरम्यान, जिल्हाधिकारी धर्मेद्र कुमार यांनी सांगितलं की, तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नोटबूक प्रकाशित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पुस्तकावर छापण्यात आलेली मुलगी ही पाकिस्तानाच युनीसेफची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असल्याची बाब शुक्रवारी समोर आली.